Join us  

आदेश बांदेकर ते दिपाली सय्यद! अभिनयासह राजकारणात सक्रीय आहेत 'हे' मराठी कलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 7:00 AM

1 / 12
कलाविश्व आणि राजकारण या दोन क्षेत्रांचा तसं पाहायला गेलं तर जवळचा संबंध आहे. आजवर अनेक कलाकारांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला आहे.
2 / 12
हिंदी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी आज राजकीय वर्तुळात पाहायला मिळतात. मात्र, यावेळी आपण राजकारणात सक्रीय असलेले मराठी कलाकार कोणते ते पाहुयात.
3 / 12
आदेश बांदेकर - होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता, सूत्रसंचालक म्हणजे आदेश बांदेकर.
4 / 12
आदेश बांदेकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून ते शिवसेना पक्षाचे सचिव आहेत. तसंच ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनही काम पाहतात.
5 / 12
सुशांत शेलार - बिग बॉस मराठीच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे सुशांत शेलार. अनेकदा फंड गोळा करुन तो गरजूंची मदत करत असतो.
6 / 12
करोना काळात सुशांतने अनेक गरजूंना मदत केली होती. तसंच शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातूनही नवनवीन उपक्रम राबवत असतो.
7 / 12
अमोल कोल्हे- अभ्यासू आणि कसदार अभिनेता म्हणून अमोल कोल्हेंकडे पाहिलं जातं. अमोल कोल्हें यांनी कित्येक वर्ष खासदार म्हणून पद भूषवलं आहे.
8 / 12
अमोल कोल्हे राजकारणाप्रमाणेच कलाविश्वातही सक्रीय आहेत. अनेक मालिका, चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.
9 / 12
दिपाली सय्यद - दिपाली सय्यद यांनी नुकताच राजकारणात प्रवेश घेतला आहे. काही काळापूर्वीच तिने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
10 / 12
राजकारणात सक्रीय झाल्यापासून दिपाली तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत आहे.
11 / 12
नित्यश्री ज्ञानलक्ष्मी - 'लक्ष्मी' या मालिकेतून नित्यश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु, कलाविश्वात ती फारशी सक्रीय नाही. त्याऐवजी ती राजकारणात सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
12 / 12
ती देखील राजकारणात सक्रिय आहे. ती सध्या एका वेल्फेअर सोसायटी सोबत काम करत आहेत.
टॅग्स :सेलिब्रिटीआदेश बांदेकरदीपाली सय्यद