Join us  

अमृता खानविलकरला पतीकडून सरप्राईज,वाढदिवसाचं असं केलं जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 5:22 AM

वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले. मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू ...

वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले. मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत. मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रिअॅलिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं आहे. नुकताच रसिकांच्या या लाडक्या अभिनेत्रीचा म्हणजेच अमृता खानविलकर हिचा वाढदिवस झाला. मोठ्या उत्साहात रसिकांनीही अमृताचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांनी अमृताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अमृताच्या घरीही तिचा ३२वा वाढदिवस दणक्यात सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी तिचा पती आणि टी.व्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि अमृताच्या आईने तिच्यासाठी खास सरप्राईज पार्टी ठेवली होती. बर्थ डे सेलिब्रेशन दरम्यान मराठी अभिनेत्री सोनाली खरेसुद्धा आपल्या खास मैत्रिणीला शुभेच्छा देण्यासाठी यावेळी आवर्जून उपस्थित होती. अमृताच्या या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो हिमांशूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाढदिवसानिमित्त अमृताला पती हिमांशूकडून खास गिफ्टसुद्धा मिळालं आहे. हेच गिफ्ट हातात घेतलेला फोटोही यांत पाहायला मिळतो आहे. या फोटोंमध्ये अमृता आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. अमृताच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दादर मध्ये असलेल्या प्रगती विद्यालय या कर्णबधीर मुलांच्या शाळेला भेट देऊन अमृताने तिचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला. या मुलांसोबत अमृताने तिच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. बर्थडे सेलिब्रेशनच्या निमित्ताने या शाळेतील मुलांची भेट घेतली. तिथल्या शिक्षकांनी तिचे विशेष स्वागत केले. स्वतः बनवलेली कागदी फुले तिला भेट म्हणून दिली. हे सर्व पाहून अमृता प्रचंड खूश झाली. तिने या मुलांसोबत डान्स देखील केला.अमृता खानविलकरने एका वेगळ्या प्रकारे तिचा वाढदिवस साजरा करत अनेकजणांना प्रेरणा दिली. याविषयी अमृता सांगते, शाळेत असताना मी वाढदिवस शाळेतील मित्र मैत्रिणीसोबत खाऊ वाटून साजरा करायची. पण आता इथे येऊन या मुलांना खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी समाधानी झाले आहे. इथे येऊन मी बरेच काही शिकले. ही मुले धन्यवाद, स्वागत हे  हावभावाने करतात. त्यांची टाळ्या वाजवण्याची पद्धत तर फारच सुंदर आहे. मी आता अशाचप्रकारे टाळ्या वाजवायला शिकणार आहे. इतकं सगळं नवीन शिकायला मिळणं हा एक प्रकारचा स्वार्थच आहे नाही का?' सध्या अमृता 'डान्स इंडिया डान्स' या डान्स रिअॅलिटी शो मध्ये सूत्रसंचालन करत आहे.