Join us  

वडिलांच्या आठवणीत काढलाय हटके 'टॅटू', मराठी अभिनेत्रींमध्येही आहे प्रचंड क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 3:45 PM

1 / 7
तरुणांमध्ये टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. वेगवेगळ्या धाटणीचे, काही ना काही अर्थ असलेले हटके टॅटू काढण्याकडे त्यांचा कल असतो. सेलिब्रिटींमध्येही टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. अनेक मराठी अभिनेत्रींनीही आपला टॅटू अनेकदा सोशल मीडियावर फ्लॉन्ट केला आहे. कोणाच्या टॅटूमागे काय अर्थ आहे बघुया
2 / 7
महाराष्ट्राची लाडकी प्राजक्ता माळीच्या (Prajakta Mali) हातावरही पूर्वीपासून टॅटू आहे. तिने 'आशा' असं लिहून घेतलं आहे. आशा तिच्या आईचं नाव आहे.
3 / 7
हृता दुर्गुळेच्या (Hruta Durgule) उजव्या हाताच्या मनगटावर एक टॅटू आहे. 'hdp' ही इंग्रजी अक्षरं तिने लिहून घेतली आहेत. हा तिचा पहिलाच टॅटू आहे. हृताने तिच्या अत्यंत जवळच्या मैत्रिणी ध्रुवी आणि पूर्वा यांच्या नावाचं पहिलं इंग्रजी अक्षर आणि स्वत:च्या नावाचं पहिलं इंग्रजी अक्षर असा तो टॅटू केला आहे.
4 / 7
अभिनेत्री सखी गोखलेच्या (Sakhi Gokhale) गळ्यावर असलेला टॅटूही खूप स्पेशल आहे. तिच्या बाबांची आठवण करुन देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी तिने लिहिल्या आहेत. 'ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातिल एक वीराणी,गगनात विऱ्सजित होता डोळ्यात कशाला पाणी' असं लिहिलेला टॅटू सखी गोखलेनं काढला आहे. सखीचे वडील मोहन गोखलेंनी जाण्याआधी घराच्या दारावर या ओळी लिहिल्या होत्या.
5 / 7
अभिनेत्री सायली संजीवनेही (Sayali Sanjeev) तिच्या बाबांच्या आठवणीत टॅटू काढला आहे. 'बाबा तुझ्यासाठी...' असं कॅप्शन देत तिने पक्ष्याची डिझाईन असलेला टॅटू काढला आहे. तिच्या या टॅटूची खूप चर्चा झाली होती.
6 / 7
मिताली मयेकरने (Mitali Mayekar)टॅटू काढले आहेत. ती हॅरी पॉटरची मोठी चाहती आहे. तिने हातावर Always आणि पुढे हॅरी पॉटरचा सिम्बॉल गोंदवला आहे. याशिवाय तिने दुसऱ्या हातावर तिचा पाळीव कुत्रा डोरा सारखा दिसणारा टॅटू काढला आहे.
7 / 7
तेजस्विनी पंडितनेही (Tejaswini Pandit) तिच्या पाठीवर आगळावेगळा टॅटू काढला आहे. स्त्री शक्तीचं प्रतिक म्हणून 'हँड्स ऑफ फातिमा' हा ग्लॅमरस टॅटू काढला जातो. हँड्स ऑफ फातिमा म्हणजे सकारात्मकता.
टॅग्स :मराठी अभिनेताऋता दूर्गुळेप्राजक्ता माळीतेजस्विनी पंडित