Join us  

Photos: मराठी संस्कृती जपली पाहिजे सईबाई! हॉट फोटोशूटमुळे सई ताम्हणकर होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 10:03 AM

1 / 8
मराठी तसंच हिंदीतही आपल्या अभिनयाचा डंका गाजवणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Saie Tamhankar) मोठा चाहतावर्ग आहे. मूळची सांगलीची असलेली सई गेल्या १५ वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहे.
2 / 8
सई ताम्हणकर तिच्या बोल्ड अँड बिन्धास्त स्वभावामुळे ओळखली जाते. तिने नुकतंच पोस्ट केलेल्या हॉट फोटोशूटमुळे नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. इतकंच नाही तर सईला नेटकऱ्यांनी तिला मराठी संस्कृतीची जाणीवही करुन दिली आहे.
3 / 8
सई ताम्हणकर याआधीही काही फोटोंमुळे आणि विचित्र पोजमुळे ट्रोल झाली आहे. मराठी सिनेमा 'नो एन्ट्री पुढे धोका आहे' मध्ये सईने बिकीनी घातली होती. तेव्हाही तिची चांगलीच चर्चा झाली होती.
4 / 8
मराठी सिनेमात बिकीनी घालणारी ती पहिलीच अभिनेत्री. यानंतर सईने 'हंटर' या हिंदी सिनेमात बोल्ड सीन दिले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
5 / 8
आता सईचे हे लेटेस्ट फोटो पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. यात तिने तपकिरी रंगाचा बिकीनी सूट घातला आहे. त्यावर पांढऱ्या रंगाचं जॅकेट घेतलं आहे.
6 / 8
सईने असे तीन फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या मादक अदा पाहून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. नम्रता संभेराव, प्रार्थना बेहेरे, मधुराणी प्रभुलकर या अभिनेत्रींनी सईच्या फोटोंवर कमेंट करत तिची स्तुती केली आहे. मधुराणीने तर प्रभावित होऊन 'अशक्य' अशी कमेंट केली आहे.
7 / 8
तर दुसरीकडे अपेक्षेप्रमाणे अनेक नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे. 'मराठी संस्कृती जपली पाहिजे सईबाई','आपण कुठे राहतो आहे सई ताम्हणकर मराठी संस्कृती संपली का तुमची?','या वयात काय सिद्ध करायचंय सई तुला' अशा अनेक कमेंट्सने तिचं सेक्शन भरलं आहे.
8 / 8
सईने सध्या या सर्व कमेंट्सकडे दुर्लक्ष केलं असून एकालाही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती लवकरच सिद्धार्थ चांदेकरसोबत 'श्रीदेवी प्रसन्न' या मराठी सिनेमात झळकणार आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरमराठी अभिनेतासोशल मीडियाट्रोल