Join us  

PHOTOS : एवढं भारी कुणी दिसतं का? सईच्या हटके लुकवर चाहते फिदा, 'फिल्मफेअर'वरही तिचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:08 AM

1 / 9
सई ताम्हणकर म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड, ग्लॅमरस अभिनेत्री. आता तर बॉलिवूडमध्येही तिचा बोलबाला आहे. सध्या तिचीच चर्चा आहे.
2 / 9
सईने यंदाचा फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरलं आहे. आयफा अवार्ड जिंकल्यानंतर आता तिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
3 / 9
यंदाच्या फिल्मफेअरमध्ये सईला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. ‘मिमी’ या सिनेमासाठी तिला हा पुरस्कार मिळाला.
4 / 9
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातील सईचा हटके लुकही चर्चेत राहिला. तिच्या लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
5 / 9
तशीही सई ताम्हणकर तिच्या हटके लूकसाठी ओळखली जाते. इव्हेंट कुठलाही असो सर्वांमध्ये सईचे आउटफिट, तिचा लुक नेहमीच उठून दिसले आहेत. मग फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सईच्या लुकची चर्चा तर होणारच.
6 / 9
सईने यावेळी निकिता टंडन या फॅशन डिझायनरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. यावरची तिची हेअरस्टाईल हटके होती.
7 / 9
या ड्रेसमध्ये सईने झक्कास पोझ दिल्यात. त्याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8 / 9
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. आता काय मी वाचत नाही भाऊ, एवढं भारी कुणी दिसतं का? अशी एका चाहत्याची कमेंट लक्षवेधी ठरली.
9 / 9
कुणी शब्द देता का शब्द... कारण माझ्याकडे नाहीत, असं एका चाहत्याने लिहिलं. सईचा लुक पाहून या चाहत्याला जणू शब्द सुचेनात...
टॅग्स :सई ताम्हणकरफिल्मफेअर अवॉर्डमराठी अभिनेता