Join us  

PHOTOS : अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले साखरपुड्याचे नवे फोटो; तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 5:05 PM

1 / 9
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनं चाहत्यांना सुखद धक्का दिला. तिचा नुकताच साखरपुडा पार पडला.
2 / 9
साखरपुड्याचे काही नवे फोटो भाग्यश्रीने शेअर केले आहेत. या फोटोत ती, तिचा होणारा नवरा आणि कुटुंबीय दिसत आहेत.
3 / 9
साखरपुड्याच्या कार्यक्रमात भावी वर-वधु दोन्ही पक्षांचे लोक धम्माल करताना दिसत आहेत.
4 / 9
भाग्यश्रीच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसंडून वाहतोय. होणारा नवरा विजय पालांडेसोबत तिने झक्कास पोझ दिल्या आहेत.
5 / 9
भाग्यश्रीच्या खासगी आयुष्याची अनेकदा चर्चा झाली. पण तिनं तिच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच काही लपवलं नाही.
6 / 9
काही महिन्यांपर्ू्वी भाग्यश्रीनं तिचं रिलेशनशीप स्टेटसही शेअर केलं होतं. हृतिक रोशनचा मेकअप आर्टिस्ट विजय पलांडे विजय पलांडेसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती.
7 / 9
आता दोघांचा साखरपुडा पार पडलाय. लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार आहे. भाग्यश्री देवश्री गणेश मालिकेत काम करत होती. त्यात तिनं देवी पार्वतीचा भूमिका साकारली होती.
8 / 9
तिनं मराठी सिनेमांतही काम केलंय. २०११ मध्ये शोधू कुठे या मराठी सिनेमातून तिनं सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
9 / 9
भाग्यश्रीनं तेलगू सिनेमातही भूमिका केली आहे. भाग्यश्री मराठी इंडस्ट्रीतली बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
टॅग्स :भाग्यश्री मोटेमराठी अभिनेता