Join us  

काळी साडी अन् बोल्ड अदा! सखी गोखलेच्या लूकवर चाहते फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 5:52 PM

1 / 7
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सखी गोखले. सखी मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची एकुलती एक मुलगी आहे. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सखीने अभिनय क्षेत्रात करिअर घडवण्याचा निर्णय घेतला.
2 / 7
सखीने अनेक मालिका आणि चित्रपटांतही काम केलं आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी'नंतर सखी 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेत झळकली होती. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट्सबाबत पोस्टच्या माध्यमातून ती चाहत्यांना माहिती देत असते.
3 / 7
सखी इन्स्टाग्रामवर अनेकदा तिचे फोटो शेअर करताना दिसते. नुकतंच तिने फोटोशूट केलं आहे. याचे काही फोटो सखीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 7
फोटोशूटसाठी सखीने खास काळ्या रंगाची साडी नेसल्याचं दिसत आहे. त्यावर मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊजने सखीने फॅशन केली आहे. केस मोकळे सोडत सखीने कातिल लूक केला आहे.
5 / 7
सखीने घातलेली सिल्वर ज्वेलरी लक्ष वेधून घेत आहे. हलकासा मेकअप करत सखीने मनमोहक लूक केला आहे. तिच्या या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
6 / 7
बोल्ड आणि ब्युटिफूल सखीने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत. तिचं हे फोटोशूट चर्चेत आहे. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एवढंच काय तर ऋतुजा बागवे आणि सायली संजीवनेही सखीच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
7 / 7
सखीने २०१९ साली अभिनेता सुव्रत जोशीबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सखी आणि सुव्रत ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. त्यांचे हजारो चाहते आहेत.
टॅग्स :सखी गोखलेमराठी अभिनेतामराठी चित्रपट