Join us  

कुशल बद्रिकेच्या पत्नीचे बोल्ड फोटो व्हायरल; सुनयनाचा लूक पाहून चाहते थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 11:54 AM

1 / 10
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके.
2 / 10
उत्तम अभिनयकौशल्य आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधण्याचं कौशल्य यांच्या जोरावर कुशलने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.
3 / 10
कुशल कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो त्याच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टी सुद्धा चाहत्यांसोबत शेअर करतो.
4 / 10
कुशल बऱ्याचदा त्याच्या पत्नीविषयी म्हणजेच सुनयनाविषयी पोस्ट शेअर करत असतो. त्याच्या या प्रत्येक पोस्टमधून त्याचं पत्नीवरचं प्रेम दिसून येतं.
5 / 10
अलिकडेच सुनयनाने सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची सुंदर आणि बोल्ड दिसून येत आहे.
6 / 10
सुनयनाने कॅलिफॉर्निया येथे खास फोटोशूट केलं असून यात तिचा बोल्ड अॅटिट्यूड दिसून येत आहे.
7 / 10
सुनयनाचे हे फोटो पाहून नेटकरी सध्या त्यावर कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
8 / 10
सुनयना सुद्धा कुशलप्रमाणेच कलाविश्वाशी निगडीत आहे. ती एक कथ्थक नृत्यांगना आहे.
9 / 10
सुनयना हिने कथ्थकचं पदवीधर शिक्षण घेतलं आहे. कथ्थकमध्ये विशारद आणि अलंकार अशी पदवी तिनं संपादन केली आहे.
10 / 10
सुनयना स्कूल ऑफ कथ्थक अशी नृत्यसंस्था देखील चालवते.
टॅग्स :कुशल बद्रिकेटेलिव्हिजनचला हवा येऊ द्यासेलिब्रिटी