Join us  

Akash Thosar : परश्याचा नवा लुक, पाहा, आकाश ठोसरचं कलरफुल फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 5:54 PM

1 / 8
'सैराट' मधील आर्ची आणि परश्याच्या जोडीनं संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं होतं. होय, 'सैराट'मुळे आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू एका रात्रीत स्टार झाले.
2 / 8
'सैराट' नंतर दोघांनीही मागे वळून पाहिलं नाही. दोघांचाही लुक बदलला, स्वत:च्या स्टाईल, फॅशन, लुक्सवर दोघांनीही बरीच मेहनत घेतली.
3 / 8
आम्ही हे नव्यानं का सांगतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर कारण आहे, आकाशचे नवे कलरफुल फोटो.
4 / 8
होय, आकाशने एक कलरफुल फोटोशूट केलं आहे. त्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5 / 8
चाहते आकाशच्या या कलरफुल फोटोंच्या प्रेमात पडले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
6 / 8
सैराट चित्रपटानंतर महेश मांजरेकर यांनी 'एफयू – फ्रेंडशिप अनलिमिटेड' या चित्रपटात आकाशला संधी दिली. अर्थात हा सिनेमा म्हणावा तसा चालला नाही.
7 / 8
पण आकाशला लगेच दुसरी संधी मिळाली. दोन मराठी सिनेमानंतर त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत दणक्यात पदार्पण केलं. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या 'लस्ट स्टोरीज' चित्रपटात त्याची वर्णी लागली.
8 / 8
यानंतर झुंडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली, १९६२ द वॉर इन द हिल्स या वेबसीरिजमध्ये तो झळकला.
टॅग्स :आकाश ठोसरमराठी अभिनेतामराठी चित्रपट