Join us

मुलाच्या वाढदिवशी अशा अंदाजात जिममध्ये पोहोचली मलाइका अरोरा, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. त्यामुळेच या वयातही तिच्या सौंदर्यात कुठलाच बदल झालेला दिसत नाही. उलट वाढत्या वयात तिचे रूप आणखीच खुलून दिसत आहे. असो, मलाइकाने तिच्या मुलाचा कालच वाढदिवस साजरा केला. परंतु तिने जिम जाणे टाळले नाही. नेहमीच्याच अंदाजात ती जिममध्ये पोहोचली.

बॉलिवूडची आयटम गर्ल मलाइका अरोरा तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड सजग आहे. त्यामुळेच या वयातही तिच्या सौंदर्यात कुठलाच बदल झालेला दिसत नाही. उलट वाढत्या वयात तिचे रूप आणखीच खुलून दिसत आहे. असो, मलाइकाने तिच्या मुलाचा कालच वाढदिवस साजरा केला. परंतु तिने जिम जाणे टाळले नाही. नेहमीच्याच अंदाजात ती जिममध्ये पोहोचली. मलाइकाला पंधरा वर्षांचा मुलगा आहे. परंतु अशातही ती स्वत:ला फिट आणि अ‍ॅक्टिव्ह ठेवते. पती अरबाज खान याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर मलाइका मुलासोबत राहत आहे.मलाइकाने बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून सुरुवात केली होती. पुढे तिने हीच ओळख कायम ठेवत छोट्या पडद्यावरही आपला करिष्मा दाखविला.मलाइका आणि अरबाजचे १८ वर्षांपूर्वीचे संबंध काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आले. या दोघांनी कायदेशीररीत्या घटस्फोट घेतला.मलाइका सध्या सिंगल लाइफ जगत आहे, तर अरबाज एका रोमानियन तरुणीला डेट करीत असल्याची बातमी समोर येत आहे.