Join us  

सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट ! महाराष्ट्राची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीनं दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:48 PM

1 / 10
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोनाली कुलकर्णी प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करते.
2 / 10
आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. आज घरोघरी गुढ्या उभारत नवीन वर्षं थाटात साजरं केलं जातं.
3 / 10
फक्त सामान्य जनताच नाही तर मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
4 / 10
महाराष्ट्राची 'अप्सरा' सोनाली कुलकर्णीने तिचा फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
5 / 10
सोनालीनं 'सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट ! आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात ! नव्या वर्षाची सोनेरी सुरुवात' असं म्हणत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.
6 / 10
सोनाली कुलकर्णीने विधिवत गुढीची पुजा केल्याचं फोटोमध्ये दिसून येत आहे. तिनं गुढीबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.
7 / 10
सोनालीने अगदी मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात गुढीपाडवा साजरा केला.
8 / 10
याचे काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत तिला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
9 / 10
सोनाली कुलकर्णीने पिवळ्या रंगाची साडी नेसत, नाकात नथ घालून मराठमोळा साज केला.
10 / 10
मराठमोळ्या लूकमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीसेलिब्रिटीगुढीपाडवा २०१८मराठी