Join us  

राजा राणीची गं जोडी..! अभिजीत खांडकेकर आणि त्याची पत्नी सुखदाचे रोमँटिक फोटो होतायेत व्हायरल, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 3:50 PM

1 / 8
अभिजीत खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपलपैकी एक आहेत. (PHOTO:INSTAGRAM)
2 / 8
अभिजीत आणि सुखदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोना चाहत्यांनी पसंतीदेखील मिळते. (PHOTO:INSTAGRAM)
3 / 8
अभिजीतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्नी आणि अभिनेत्री सुखदासोबतचा ट्रेडिशनल लूकमधले फोटो शेअर केला आहेत. (PHOTO:INSTAGRAM)
4 / 8
फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. (PHOTO:INSTAGRAM)
5 / 8
अभिजीत आणि सुखदाचा रोमाँटिक अंदाजातील फोटो पाहून त्याचे फन्सही फिदा झालेत. फोटोवर त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.(PHOTO:INSTAGRAM).
6 / 8
छोट्या पडद्यासह अभिजीतनं मोठ्या पडद्यावरही मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा', 'ध्यानीमनी', 'भय', 'ढोलताशे' या सिनेमात अभिजीतने भूमिका साकारल्यात.(PHOTO:INSTAGRAM)
7 / 8
'क्रिमिनल्स... चाहूल गुन्हेगारांची' ही मराठी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे सूत्रसंचालन अभिजीत करणार आहे. (PHOTO:INSTAGRAM)
8 / 8
दुसरीकडे सुखदा देशपांडे-खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. 'धरा की कहानी' या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे (PHOTO:INSTAGRAM)
टॅग्स :अभिजीत खांडकेकरसुखदा खांडकेकर