Join us  

Srinidhi Shetty : ‘KGF 2’ स्टार श्रीनिधी शेट्टीच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड, पाहून म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 12:47 PM

1 / 8
‘केजीएफ ३’ या सिनेमाची चाहते आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. अधिकृत घोषणा झाली नसली तरी मेकर्सनी ‘केजीएफ ३’ची हिंट मात्र दिलीये. साहजिकच या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता या चित्रपटातील श्रीनिधी शेट्टीही चर्चेत आलीये.
2 / 8
होय, श्रीनिधीने केजीएफ सीरिजमध्ये रिनाची भूमिका साकारली होती. केजीएफ २ मध्ये तिचा मृत्यू झालेला दाखवला आहे. रिनाचं पात्र संपल्यामुळे चाहते नाराज आहेत. त्यामुळे ‘केजीएफ ३’मध्ये ती असेल की नाही, याबद्दल चाहते साशंक आहेत.
3 / 8
तूर्तास ही श्रीनिधी चर्चेत आली आहे ती तिच्या फोटोंमुळे. श्रीनिधीने स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून केजीएफचे चाहते क्रेझी झाले आहेत.
4 / 8
कधी लाजतांना, कधी हसतानाचे तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
5 / 8
श्रीनिधी ही मॉडेलिंग दुनियेतील एक मोठं नाव आहे. अनेक ब्युटी कॉन्स्टेस्ट तिनं जिंकलेत. 2016 साली ‘मिस दिवा सुपरनॅशनल’ जिंकल्यानंतर ‘मिस सुपरनॅशनल’ ही सौंदर्य स्पर्धाही तिनं जिंकली. ही सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती दुसरी भारतीय मॉडेल ठरली.
6 / 8
मिस साऊथ इंडिया, मिस कर्नाटक, मिस ब्युटिफुल स्माईल असे अनेक खिताब तिनं पटकावले. मॉडेलिंगच्या दुनियेत तिचं मोठं नाव झालं आणि तिला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या.
7 / 8
‘केजीएफ 1’ हा तिचा पहिला सिनेमा होता. पहिलाच सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि श्रीनिधी एका रात्रीत स्टार झाली. ‘केजीएफ 1’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर श्रीनिधीला अनेक मोठे सिनेमे ऑफर झाले. तिला साईन करण्यासाठी निर्मात्यांच्या जणू रांगा लागल्या.
8 / 8
पण श्रीनिधीला ‘केजीएफ 2’ हातचा जाऊ द्यायचा नव्हता. या चित्रपटासाठी तिने म्हणे 7 मोठ्या सिनेमांना नकार दिला.
टॅग्स :केजीएफTollywoodसेलिब्रिटी