Join us  

Kartik Aaryan birthday bash : बर्थ डे पार्टी कार्तिक आर्यनची अन् चर्चा मात्र दिशा पाटनीची..., पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 3:57 PM

1 / 12
काल मंगळवारी कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
2 / 12
कार्तिक आर्यन यावेळी डॅशिंग लुकमध्ये दिसला. पण या पार्टीतील एका पाहुणीची सर्वाधिक चर्चा रंगली.
3 / 12
होय, ही पाहुणी कोण तर दिशा पाटनी. होय, पार्टीत दिशा तिच्या मिस्ट्री मॅनसोबत पोहोचली.
4 / 12
व्हाईट कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिशा पाटनीची झक्कास एन्ट्री झाली आणि तिच्यासोबत एका हँडसम तरूणाला पाहून सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
5 / 12
टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा अलेक्झांडर एलेक्स इलिकला डेट करत असल्याची चर्चा आहे. हाच तिचा मिस्ट्री मॅन...
6 / 12
कार्तिकच्या बर्थ डे पार्टीत अनन्या पांडे हिनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कधीकाळी अनन्या व कार्तिकच्या अफेअरच्या चर्चा होत्या.
7 / 12
अलाया एफ हिने व्हाईट साईड स्लीट ड्रेसमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लवकरच ती कार्तिकसोबत ‘फ्रेडी’ या सिनेमात दिसणार आहे.
8 / 12
आयुष्यमान खुराणा यानेही कार्तिकच्या बर्थ डे पार्टीला हजेरी लावली. तो यावेळी डॅशिंग लुकमध्ये दिसला.
9 / 12
वाणी कपूर हिने ग्लॅमरस अंदाजात पार्टीला हजेरी लावली. तिच्या युनिक ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
10 / 12
कबीर खान हा सुद्धा आपल्या पत्नीसोबत या पार्टीला हजर होता. कॅमेऱ्याला या जोडप्यानं अशी मस्त पोझ दिली.
11 / 12
फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा हा सुद्धा पार्टीत दिसला.
12 / 12
अभिनेत्री शर्वरी वाघ हिनेही स्टायलिश अंदाजात पार्टीला हजेरी लावली.
टॅग्स :कार्तिक आर्यनदिशा पाटनीबॉलिवूडअनन्या पांडेवाणी कपूर