Join us

गोव्यात करण सिंग ग्रोव्हरने पत्नी बिपाशा बसूसोबत साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याने पत्नी बिपाशा बसूसोबत गोव्यात त्याचा ३६वा वाढदिवस साजरा केला. त्याचे काही फोटोज् त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याने पत्नी बिपाशा बसूसोबत गोव्यात त्याचा ३६वा वाढदिवस साजरा केला. त्याचे काही फोटोज् त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हे दाम्पत्य बर्थ डे बॅश एन्जॉय करताना बघावयास मिळत आहे.करणने २००८ मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगम हिच्याशी पहिले लग्न केले होते.२०१२ मध्ये त्याने को-स्टार जेनिफर विंगेट हिच्याशी दुसरे लग्न केले.बिपाशा आणि करणमध्ये २०१५ या साली आलेल्या ‘अलोन’ या चित्रपटादरम्यान जवळिकता वाढली होती.बिपाशाने पती करणच्या वाढदिवसासाठी खास तयारी केली होती.या दाम्पत्याने वाढदिवसाचा जल्लोष मुंबईत न करता गोव्यात करणे पसंत केले.सेलिब्रेशनचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत.