Join us  

Kapil Sharma : घर घर की कहानी...! कपिल शर्माच्या या सवयीला वैतागली बायको गिन्नी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 10:31 AM

1 / 9
कपिल शर्मा सध्या थोडा चिंतीत आहे. याचं कारण आहे पत्नी गिन्नी चतरथची नाराजी. होय, गिन्नी कपिलवर नाराज आहे. आता बायको नाराज असताना नवऱ्याच्या चिंता वाढणारच.
2 / 9
आता गिन्नी कपिलवर का नाराज आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक असणारच. तर खुद्द कपिलने बायकोच्या नाराजीचं कारण सांगितलं आहे.
3 / 9
'द कपिल शर्मा शो'च्या ताज्या एपिसोडमध्ये न्यूज अँकर श्वेता सिंह, अंजना कश्यप आणि चित्रा त्रिपाठी गेस्ट म्हणून आल्या होत्या. कपिल शर्माने त्यांना नेहमीप्रमाणे एक ना अनेक प्रश्न विचारले.
4 / 9
स्टुडिओतून बाहेर पडल्यावर कुणाशी बोलायची इच्छा असते का?असा प्रश्न त्याने विचारला. यावर अंजना म्हणाली, खरंच स्टुडिओतून बाहेर पडल्यावर मी काही वेळ शांत असते. मला कुणाशीही बोलायची माझी इच्छा नसते.
5 / 9
अंजनाची ही गोष्ट ऐकून कपिल शर्मा तडक आपल्या जागेवरून उठतो आणि प्लीज, ही गोष्ट माझी बायको गिन्नीला सांगा. मी घरी गेल्यावर शांत बसतो, अशी तिची सारखी तक्रार असते, असं तो म्हणतो.
6 / 9
मी जेव्हा केव्हा घरी जातो, तेव्हा शांत बसतो. गिन्नीला वाटतं की मी तिच्याशी बोलत नाही. मला शांत बसायचं नसतं. पण स्थिती अशी असती की मला काही वेळ शांत बसावसं वाटतं, पण ती बिल्कुल समजून घेत नाही, असं कपिल म्हणतो.
7 / 9
यानंतर अंजना स्क्रिनकडे तोंड करून गिन्नीला समजावते. आता अंजनाने समजवल्यानंतर गिन्नीत किती बदलत होतो, ते बघूच.
8 / 9
कपिल आणि गिन्नी कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखायचे. डिसेंबर २०१८ मध्ये दोघांनी जालंधरमध्ये लग्न केलं.
9 / 9
कपिल आणि गिन्नी यांना दोन मुलं आहेत. लग्नाच्या एका वर्षानंतर डिसेंबर २०१९ मध्ये गिन्नीने मुलगी नायराला जन्म दिला. यानंतर या जोडप्याला एक मुलगा झाला, त्याचं नाव त्रिशान आहे.
टॅग्स :कपिल शर्मा द कपिल शर्मा शोटेलिव्हिजन