Join us  

अजय देवगणसोबत लग्नाआधी काजोल या व्यक्तीच्या होती प्रेमात, पण ब्रेकअप झालं अन् बदललं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 11:31 AM

1 / 9
आपल्या अदांसाठी आणि जबरदस्त अभिनयासाठी लोकप्रिय असलेली अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस. ती आता ४९ वर्षांची झाली. ५ ऑगस्ट १९७४ ला जन्मलेल्या काजोलने 'बेखुदी' सिनेमा साईन केला तेव्हा ती १६ वर्षांची होती. त्यावेळी शाळेत शिकत होती. पण करिअरसाठी तिने शाळा सोडली. चला आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
2 / 9
काजोल आणि अजय देवगणचे कपल सगळ्यांनाच खूप आवडते. त्यांना न्यासा आणि युग अशी दोन मुले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमात ते आपल्या मुलांना घेऊन येतात. तसेच त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला त्यांच्या मुलांचे फोटो पाहायला मिळतात.
3 / 9
काजोल आणि अजय देवगण यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. त्या दोघांची पहिली भेट झाली, त्यावेळी ते दोघेही दुसऱ्या कोणासोबत तरी नात्यात होते. त्या दोघांनी अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट कबूल केली आहे.
4 / 9
पहिल्या भेटीत अजय खूप एकलकोंडा असल्याचे काजोलला वाटले होते तर काजोल सेटवर खूप दंगा मस्ती करते असे अजयला जाणवले होते. तसेच ती खूपच बडबडी असल्याची देखील अजयला जाणीव झाली होती. ते दोघे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे असल्याचे त्या दोघांच्या लक्षात आले होते. पण याच कारणामुळे ते दोघे जवळ आले असे म्हणावे लागेल.
5 / 9
गुंडाराज या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईपर्यंत त्या दोघांची चांगलीच मैत्री झाली होती. त्यावेळी काजोल आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये काही प्रॉब्लेम सुरू होते.
6 / 9
त्यामुळे काजोल याबाबत अजयकडूनच सल्ला घेत असे. पण काहीच काळात काजोलचे ब्रेकअप झाले आणि काजोल आणि अजय एकमेकांच्या प्रेमात पडले.
7 / 9
त्यांच्या लव्हस्टोरीचा एक अजब किस्सा आहे. दोघांनीही एकमेकांना प्रपोज केलंच नाही म्हणे. साडेतीन चार वर्षे ते एकमेकांना डेट करायचे. सोबत फिरायचे. आता आपलं नातं मैत्रीच्या बरंच पुढं गेलंय हे त्यांना समजलं होतं.
8 / 9
पण तरीही कुणी कुणाला प्रपोज केलेलं नव्हतं. त्यानंतर अख्खं आयुष्य एकमेकांसोबत घालवायला आपण तयार आहोत, हे त्यांनी जाणलं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचं १९९९ साली दोघांनी रितसर लग्न झालं.
9 / 9
लग्न झाल्यानंतर काजोलने आपल्या संसाराला प्राधान्य दिलं आणि बॉलिवूडमधला तिचा वावर कमी झाला. मोजकेच चित्रपट ती करायला लागली. नुकतीच ती लस्ट स्टोरी २ आणि 'द ट्रायल' या वेबसिरीजमध्ये झळकली होती.
टॅग्स :काजोलअजय देवगण