Join us  

PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 7:53 PM

1 / 9
आयपीएल म्हणजे क्रिकेट विश्वासाठी एक पर्वणीच... आयपीएलचे सामने पाहण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावत असते. बॉलिवूडमधील कलाकार देखील आयपीएलचा आनंद लुटत असतात.
2 / 9
शुक्रवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. पाहुण्या केकेआरने १२ वर्षांचा इतिहास पुसत मुंबईविरूद्ध विजय मिळवला.
3 / 9
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने ऐतिहासिक कामगिरी केली. खरं तर २०१२ नंतर प्रथमच केकेआरने मुंबई इंडियन्सचा त्यांच्या घरात जाऊन पराभव केला.
4 / 9
हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आली होती. तिने सामन्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
5 / 9
जान्हवीचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना आकर्षित करणारा आहे. तिने एक भारी कॅप्शन देऊन सर्वांचे लक्ष वेधले. 'क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन', असे जान्हवीने म्हटले.
6 / 9
अभिनेत्री जान्हवी तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमी संवाद साधते.
7 / 9
दरम्यान, जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) ती डेट करत आहे.
8 / 9
जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल भाष्य करायचे झाले तर, ती लवकरच आगामी ज्युनिअर एनटीआर, 'देवरा', रामचरण तेजाच्या RC16 या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणार आहे. तर वरुन धवनसोबत ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमात झळकणार आहे.
9 / 9
टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीआयपीएल २०२४मुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स