Join us  

चक्क मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा योगा; कृतिका गायकवाडनं शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 1:19 PM

1 / 9
आज 21 जून आजचा दिवस संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. सेलिब्रिटींनी यानिमित्ताने योगा करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री कृतिका गायकवाड (Krutika Gaikwad) त्यापैकीच एक.
2 / 9
होय, सध्या तिचे योग करतानाचे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कृतिकाने चक्क मुंबईच्या रस्त्यावर योगा केला.
3 / 9
याचे अनेक फोटो व व्हिडीओ कृतिकाने शेअर केले आहेत. यात ती हॉट योगा करताना दिसतेय.
4 / 9
मुंबईची गोष्टच न्यारी..., असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. तिच्या या फोटोंवर सध्या चाहते लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
5 / 9
युवा डान्स क्चीनमध्ये झळकलेली कृतिका तिच्या हटके स्टाईल व अनोख्या फोटोशूटसाठी ओळखली जाते.
6 / 9
लॉकडाऊनच्या काळात कृतिकाने कमोडवर बसून फोटोशूट केले होते. शिवाय वर्तमानपत्राचा ड्रेस घालून केलेल्या तिच्या फोटोशूटचीही बरीच चर्चा झाली होती.
7 / 9
बंदीशाळा या सिनेमात कृतिका झळकली होती. या चित्रपटातील तिच्या ठसकेबाज लावणीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
8 / 9
विठ्ठलाशपथ, आशियाना या मालिकांमध्येही ती झळकली होती.
9 / 9
कृतिकाच्या या फोटोंवर सध्या चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
टॅग्स :आंतरराष्ट्रीय योग दिन