Join us  

भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्याला हृतिक रोशननं गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, रिसेप्शनचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 12:38 PM

1 / 10
अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा बॉयफ्रेंड विजय पालांडेसोबत साखरपुडा ९ सप्टेंबर रोजी पार पडला.
2 / 10
भाग्यश्री मोटेने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो शेअर करुन ही आनंदाची वृत्त चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
3 / 10
साखरपुड्याच्या रिसेप्शनला भाग्यश्री मोटेने गुलाबी रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता.
4 / 10
तर विजयने भाग्यश्रीला मॅचिंग असा सूट परिधान केला होता.
5 / 10
भाग्यश्री-विजयच्या साखरपुड्याला बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेण्ड सबा आझादने हजेरी लावली होती.
6 / 10
भाग्यश्रीचा भावी नवरा विजय पालांडे हा एक मेकअप आर्टिस्ट आहे.
7 / 10
हृतिक रोशनचाही बरेच मेकअप लूक त्याने डिजाइन केले आहेत. त्यामुळे हृतिकने भाग्यश्री-विजयच्या साखरपुडा सोहळ्याला हजेरी लावली होती.
8 / 10
भाग्यश्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.
9 / 10
या फोटोंवर चाहत्यांच्या लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
10 / 10
भाग्यश्री मोटेने काही दिवसांपूर्वी विजय पालांडेला डेट करत असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केले होते. बऱ्याचदा ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.
टॅग्स :भाग्यश्री मोटेहृतिक रोशन