Join us  

किम कर्दाशियनने चक्क साडी परिधान करून केले फोटोशूट, पाहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 4:27 PM

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियन हिने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केले. या साप्ताहिकाच्या मार्च महिन्याच्या अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. हॉट आणि बोल्ड दिसणारी किम या फोटोशूटमध्ये एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात बघावयास मिळाली.

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार आणि अभिनेत्री किम कार्दशियन हिने नुकतेच एका फॅशन मॅगझीनसाठी हॉट फोटोशूट केले. या साप्ताहिकाच्या मार्च महिन्याच्या अंकासाठी तिने हे फोटोशूट केले आहे. हॉट आणि बोल्ड दिसणारी किम या फोटोशूटमध्ये एका वेगळ्याच आणि हटके अंदाजात बघावयास मिळाली. किमने तिच्या या शूटमधील एका फोटोमध्ये चक्क साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये ती खूपच गॉर्जियस लूकमध्ये बघावयास मिळत आहे.किमने लाल रंगाची साडी परिधान केली असून, ती साडी डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केली आहे.एका फोटोमध्ये किमने गोल्डन रंगाचा बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.एका फोटोत तिने लाल रंगाचा लॅगकट आउटफिट परिधान केला असून, त्यात ती खूपच बोल्ड दिसत आहे.किमने तिच्या या शूटमधील काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.फोटोच्या कॅप्शनमध्ये या फोटोला तिने एक कॅप्शनही दिले आहे.किमने हे फोटोशूट वोग मॅगझीनसाठी केले आहे.