Join us

Then & Now: ९०च्या काळात गाजलेल्या 'हिप हिप हुर्रे' मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 18:22 IST

1 / 14
Hip Hip Hurray Starcast: ९० च्या काळाता टीव्हीचा गोल्डन काळ मानला जातो. जे ८० ते ९० च्या काळातील मुलं-मुली आहेत त्यांना यावर नक्कीच विश्वास बसेल. सगळेजण जुन्या गोष्टी आठवून इमोशनल होतात. त्यावेळी बरेचण त्यांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही मालिका बघण्यात घालवत होते. त्यावेळची एक लोकप्रिय मालिका होती 'हिप हिप हुर्रे' (Hip Hip Hooray). यात DeNobili हाई स्कूलच्या विद्यार्थ्यांची कहाणी होती. १९९८ मध्ये आलेली ही मालिका त्यावेळी ट्रेंडसेटर ठरली होती. त्यावेळचं मुलांचं विश्व यात दाखवण्यात आलं होतं. २००१ मध्ये ही मालिक संपली. पण आजही या मालिकेच्या आठवणी ताज्या आहेत. यातील स्टारकास्टही अनेकांच्या मनात घर करून आहे. पण ही स्टारकास्ट आता कशी दिसते? चला बघुया.
2 / 14
नीलांजना शर्मा सेन गुप्ता (मोना) - नीलंजना शर्मा सेन गुप्ताने DeNobili हाई स्कूलची हेड गर्ल 'मोना'ची भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर तिने काही बंगाली सिनेमातही काम केलं. सध्या ती एक प्रोड्यूसर आहे आणि तिचं बंगाली सुपरस्टार जीशु सेनगुप्तासोबत लग्नही झालं आहे. तिला दोन मुली आहेत
3 / 14
पूरब कोहली (मज़हर) - पूरब कोहलीने मालिकेत मजहरची भूमिका साकारली होती. मालिकेतील सर्वात पॉप्युलर चेहरा पूरबचा होता. त्यानंतर तो बऱ्याच हिंदी सिनेमात दिसला. तो 'बॉब बिश्वास' आणि 'बुबई' सिनेमातही दिसला होता. त्याने २०१८ मध्ये लॉंग टाइन गर्लफ्रेन्ड लूसी पेटनसोबत लग्न केलं.
4 / 14
नौहीद सेरुसी (मीरा) - या मालिकेत मीराची भूमिका साकारणाऱ्या नौहीदला खूप लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती बऱ्याच बॉलिवूड सिनेमात दिसली. २०२१ मध्ये आलेल्या ओटीटी वेब सीरीज 'बॉम्बे बेगम्स'मध्येही ती दिसली होती.
5 / 14
रुशद राणा (राघव) - रूशदने मालिकेत स्पोर्ट्स कॅप्टनची राघवची भूमिका साकारली होती. रूशद हा टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. बऱ्याच मालिकांमध्ये तो दिसला. सध्या तो नंबर १ मालिका 'अनुपमा' मध्ये अनिरूद्धची भूमिका साकारत आहे.
6 / 14
किश्वर मर्चेंट (नोनी) - मालिकेत NRI नोनीची भूमिका किश्वर मर्चेंटने साकरली होती. तिने 'कैसी ये यारियां', अकबर बीरबल' इत्यादी मालिकांमध्येही काम केलं. ती गेल्या काही वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे. तिने अभिनेता सुयश रायसोबत लग्न केलं. २०२१ मध्ये तिने एका बाळालाही जन्म दिला.
7 / 14
विशाल मल्होत्रा (जॉन) - विशाल मल्होत्राने साकारलेली जॉनची भूमिका ही मालिकेची जान होती. तो एक चांगला अभिनेता आहे. त्याने काही सिनेमातही कामे केली. चंदगुप्त मौर्य मालिकेतही तो दिसला होता.
8 / 14
पिया राय चौधरी (किरण) - पियाने या मालिकेत किरणची भूमिका साकारली होती. तिचं लग्न मॉडल शायन मुंशीसोबत झालं. तो २००६ मध्ये जेसिका लालच्या हत्येचा वादग्रस्त साक्षीदार होता. २०१० मध्ये कपल वेगळं झालं. दोघेही आता इंडस्ट्रीत नाहीत.
9 / 14
मेहुल निसार (मेहुल) - मेहुल निसारने त्याच्या अभिनयाची सुरूवात याच मालिकेपासून केली होती. त्यानंतर तो १०० पेक्षा जाहिरातींमध्ये दिसला. तो अखेरचा 2021 मध्ये आलेल्या 'कभी कभी इत्तेफ़ाक से' मालिकेत दिसला होता.
10 / 14
कॅंडिडा फर्नांडीस (अलीशा) - कॅडिडाने शाळेतील नव्या मुलीची भूमिका साकारली होती. यानंतर ती बऱ्याच जाहिरातींमध्ये दिसली.
11 / 14
शाहरुख भरूचा (साइरस) - या मालिकेत सर्वात गमतीदार भूमिका ही सायरस होती. नंतर त्याने इंडस्ट्री सोडली आणि तो न्यूझलॅंडमध्ये सेटल झाला. आता तो एक यशस्वी बॅंकर आहे.
12 / 14
समेन्थ ट्रिमेन (सामंथा) - समेन्थ ट्रिमेनने 'हिप हिप हुर्रे' मध्ये सामंथाची भूमिका साकारली होती. तिला दिल चाहता सिनेमामुळेही लोकप्रियता मिळाली. तिने आमिर खानची भूमिका आकाशसोबत प्रेम करणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. आता ती एक प्रोफेशनल पीआर आहे.
13 / 14
ज़फ़र कराचीवाला (रफ़ी) - जफर कराचीवालाने मालिकेत रफी नावाच्या मुलााची भूमिका साकारल होती. तो अखेरचा २०२१ मध्ये 'रश्मि रॉकेट' सिनेमात दिसला होता.
14 / 14
श्वेता साल्वे (प्रिशिता) - या मालिकेतील शाळेतील सर्वात हॉट मुलगी श्वेता साळवे म्हणजे प्रितिशा होती. त्यानंतर तिने अनेक मालिका केल्या. २०१२ मध्ये तिने लॉंग टाइम बॉयफ्रेन्ड हरमीत सेठीसोबत लग्न केलं.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी