Join us

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील सावलीच्या रिअल लाइफमधील आईला पाहिलंत का?, दिसते तिच्यासारखी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 17:45 IST

1 / 9
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'सावळ्याची जणू सावली'. या मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने साकारली आहे.
2 / 9
अभिनेत्री प्राप्ती रेडकर 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतून घराघरात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेनंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
3 / 9
प्राप्ती रेडकर हिने अभिनय क्षेत्रात बालकलाकार म्हणून पदार्पण केले. ‘किती सांगायचंय मला’ ही तिची पहिली मालिका होती.
4 / 9
प्राप्ती रेडकरच्या या प्रवासात तिला तिच्या आई वडिलांची चांगली साथ लाभली आहे.
5 / 9
प्राप्ती रेडकरच्या आईचं नाव ज्योती रेडकर असून तीदेखील लेकीप्रमाणेच दिसायला सुंदर आहे.
6 / 9
प्राप्ती रेडकर बऱ्याचदा आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
7 / 9
प्राप्ती रेडकरची आई ज्योती आणि वडील प्रवीण यांनादेखील गायन आणि नृत्याची आवड आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात.
8 / 9
प्राप्ती रेडकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘किती सांगायचंय मला’ या मालिकेव्यतिरिक्त ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे.
9 / 9
सध्या ती सावळ्याची जणू सावली मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते आहे.
टॅग्स :झी मराठी