Join us  

Happy Birthday Nayantara :एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते नयनतारा आणि प्रभुदेवा, पण का तुटलं नातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 3:05 PM

1 / 7
साउथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे नयनतारा. आज तिने तिची वेगळी ओळख तयार केली आहे. नयनताराने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहे. आज ती तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने सेलिब्रिटींसह तिचे फॅन्सही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
2 / 7
नयनताराने आयुष्यात खूप यश मिळवलं, पण ती नेहमीच तिच्या लव्ह लाइफमुळे जास्त चर्चेत राहिली. नयनताराला दक्षिणेतील लेडी सुपरस्टार मानलं जातं. आणि हा टॅग तिला प्रभूदेवाने दिला होता. एकेकाळी प्रभूदेवा आणि नयनतारा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. दोघेही लग्नही करणार होते. पण अचानक दोघे वेगळे झाले. चला जाणून घेऊ कारण....
3 / 7
नयनताराचा जन्म १८ नोव्हेंर १९८४ मध्ये बंगळुरूमध्ये एका मल्याळम ख्रिश्चन फॅमिलीत झाला होता. तिचं खरं नाव डायना मरियम कुरियन आहे. तिचे वडील वायुसेनेत अधिकारी होते. त्यामुळे ती बालपणापासून वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरली. तिचं शिक्षण चेन्नई, दिल्ली, गुजरात आणि थिरूवला इथे झालं. नयनताराने कॉलेजला असताना मॉडलिंगच्या विश्वात पाउल ठेवलं होतं.
4 / 7
नयनताराने अभिनयाची सुरूवात मल्याळम सिनेमा 'मनासिनकारे'तून केली होती. यात नयनतारासोबत जयराम दिसला होता. त्यानंतर २००५ मध्ये तिने 'अय्या' सिनेमातून तमिळ सिनेमात एन्ट्री घेतली आणि नंतर लक्ष्मी सिनेमातून ती तेलुगू इंडस्ट्रीत गेली. तिचा सर्वात हिट सिनेमा चंद्रमुखी आहे. यात तिच्यासोबत रजनीकांत होता.
5 / 7
नयनतारा आणि प्रभूदेवाचं नातं Villu सिनेमाच्या सेटवरून सुरू झालं होतं. या सिनेमात नयनतारा मुख्य अभिनेत्री होती. तर प्रभूदेवा या सिनेमाचा दिग्दर्शक होता. नयनतारा त्या काळात सिंगल होती, पण प्रभूदेवा विवाहित होता. दोघे बराच काळ एकमेकांना डेट करत होते. दावा केला जातो की, दोघे बराच काळ लिव इनमध्ये होते. दोघांना लग्नही करायचं होतं. पण प्रभूदेवाची पत्नी लताने असं होऊ दिलं नाही.
6 / 7
प्रभूदेवाच्या पत्नीने फॅमिली कोर्टात याचिका टाकली. त्यानंतर ती उपोषणाला बसली. यादरम्यान महिला संघटनांनी प्रभूदेवाच्या पत्नीला साथ दिली. नयनताराचा पुतळा जाळून तिचा विरोध केला. या घटनांमुळे नयनतारा आणि प्रभूदेवाचं नातं हळूहळू तुटलं. २०१२ मध्ये नयनताराने प्रभूदेवासोबतचं आपलं नातं संपवलं.
7 / 7
आता नयनतारा सिने दिग्दर्शक विग्नेश शिवनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तिने त्याच्यासोबत आपला ३७ वा वाढदिवस साजरा केला. काही दिवसांपूर्वीच दोघांनी साखरपुडाही केला. सोशल मीडियावर कपलचे नेहमीच फोटो व्हायरल होत असतात.
टॅग्स :Tollywoodप्रभू देवा