Join us

सनी लिओनीने घेतला अलिशान बंगला, केली गणपतीची स्थापना

By admin | Updated: May 18, 2017 21:45 IST

बॉलिवूडची "बेबी डॉल" सनी लिओनी आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनीचे अच्छे दिन सुरू झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि.18 - बॉलिवूडची "बेबी डॉल" आणि आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या सनी लिओनीचे ख-या अर्थाने अच्छे दिन सुरू झाले आहेत. बॉलिवूडच्या या हॉट अभिनेत्रीने आपला पती डेनियलसोबत लॉस एंजेलिसमध्ये एक अलिशान बंगला विकत घेतला आहे. येथे बंगला असावा हे सनीचं अनेक वर्षांपासून स्वप्न होतं. या बंगल्याचा फोटो इंटरनेटवर सध्या व्हायरल होतोय. 
 
सनीचा हा बंगला शेर्मन ओक्स परिसरात आहे. येथे हॉलिवूडचे अनेक दिग्गज राहतात. हा बंगला तब्बल 5 बीएचके आहे. सनी आणि डेनियल दोघंही लवकरच येथे शिफ्ट होणार आहेत. आपल्या नव्या घराला सजवण्यासाठी दोघांनी खास नेपाळ, इटली आणि स्पेनवरून इंटेरियरची खरेदी केली आहे. 
 
हा बंगला म्हणजे सनीच्या 36 व्या वाढदिवसाचं गिफ्ट आहे. ब-याच वर्षांपासून डेनियल आणि सनीला येथे बंगला खरेदी करायचा होता अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. सनीचा हा बंगला जवळपास 1 एकर परिसरात पसरला आहे.
 
याच आठवड्यात त्यांना घराचा ताबा मिळाला. सनीच्या बंगल्यात 5 बेडरूम एक होम थिएटर, स्विमिंग पूल, आउटडोर डायनिंग एरिया आणि मोठं गार्डन आहे.
 
  
विशेष म्हणजे, सनी आणि डेनियल दोघांनी बंगल्याच्या प्रवेश खोलीतच 2 फुटी भगवान गणपतीच्या मुर्तीची स्थापना केली आहे.