Join us

सलमान खान हिट अँड रन घटनाक्रम

By admin | Updated: April 1, 2015 00:00 IST

३० मार्च २०१५ : अपघातावेळी सलमान नव्हे तर आपण गाडी चालवत होतो अशी कबुली सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याने ...

३० मार्च २०१५ : अपघातावेळी सलमान नव्हे तर आपण गाडी चालवत होतो अशी कबुली सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंग याने दिल्याने या खटल्यात सलमानला मोठा दिलासा मिळाला. तसेच गाडीचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाला असेही ड्रायव्हरने सांगितले

२८ मार्च २०१५ : हिट अँड रन खटल्याच्या सुनावणी दरम्यान मीडियाला प्रवेश नको ही सलमानची याचिका न्यायालयाने मान्य केली.

१८ मार्च २०१५ : २००२ साली सलमानकडे ड्रायव्हिंगचा अथवा दारूचा परवाना नव्हता हे स्पष्ट करणारी डॉक्युमेंट्स न्यायालयाने स्वीकारली.

८ मार्च २०१५ : सलमान खानच्या दिवंगत सुरक्षारक्षकाची साक्ष वापरता येऊ शकते असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने त्याची साक्ष न्यायालयासमोर पुन्हा मांडण्यात आली.

२२ जानेवारी २०१५ : अपघातावेळी सलमान दारूच्या अमलाखाली नव्हता असे सांगत सलमानची तपासणी करणा-या डॉक्टरने साक्ष फिरवली.

२४ नोव्हेंबर २०१४ : हा खटला तब्बल १२ वर्षांपासून चालत असल्याचे सांगत सरकारी वकिलांनी न्यायालयाला हा खटला फास्ट ट्रॅक करण्याची विनंती केली.

२४ जुलै २०१३ : सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२२ मे २०१० : अपघातावेळी सलमानने दारू प्यायली होती असा दावा अपघातानंतर सलमानची रक्ततपासणी करणा-या डॉक्टरने केला होता.

३ ऑक्टोबर २००७ : या खटल्यातील महत्वाचा साक्षीदार आणि सलमान खानचा माजी सुरक्षारक्षक रविंद्र पाटील याचा टीबीमुळे मृत्यू झाला. दारू प्यायलेली असल्याने आपण सलमानला रॅश ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला दिला होता असा दावा रविंद्रने केला होता. अपघातावेळी सलमानच गाडी चालवत होता असेही त्याने सांगितले होते. मात्र काही काळानंतर रविंद्रने त्याची साक्ष बदलत अपघातावेळी सलमानने दारू प्यायली होती की नाही याबद्दल आपण साशंक असल्याचे म्हटले होते.

२ मे २००३ : पादचा-यांना चिरडून मारल्याचा आपल्यावरील गंभीर आरोप मागे घ्यावा अशी याचिका सलमानने न्यायालयात केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली.

२९ सप्टेंबर २००२ : पोलिसांनी अटक केलेल्या सलमानची जामीनावर सुटका झाली.

२८ सप्टेंबर २००२ : अभिनेता सलमान खानच्या लँड क्रूझर या गाडीने वांद्र्यातील हिल रोडवरील अमेरिकन एक्स्प्रेस बेकरीनजीकच्या फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले. या अपघातात एक जण ठार झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातावेळी सलमान गाडी चालवत होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते मात्र सलमानने ते वृत्त फेटाळले. अपघातस्थळावरून पळून गेल्यामुळे पोलिसांनी सलमानला अटक करत त्याच्यावर हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला.

२००२ साली अभिनेता सलमान खानने बेदरकारपणे गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांना चिरडल्याप्रकरणाच्या खटल्याचा घटनाक्रम..

6 मे २०१५ : मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूस व चौघा जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.