Join us  

कधी एअरपोर्ट तर कधी स्वीमिंग पुल, श्रिया सरनचा पतीसोबत रोमॅंटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 5:49 PM

1 / 7
नुकताच श्रिया आणि तिच्या पतीचा एयरपोर्टवर लिपलॉक करतानाचा व्हिडिओ समोर आला. मात्र यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. घरात जागा नाही का की कॅमेरासमोर करायला जास्त आवडते, कॅमेऱ्यासमोर नेहमी लिपलॉक करणे गरजेचे आहे अशी शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली.
2 / 7
आत्ताच रिलीज झालेल्या दृश्यम २ च्या स्क्रीनिंगवेळीही या कपलने सर्वांसमोर लिपलॉक केले. यामुळे कपलला सारखाच ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
3 / 7
याआधीही श्रिया चा स्वीमिंग पुल मध्ये लिपलॉक करतानाचा फोटो फारच व्हायरल झाला होता. यामध्ये दोघेही रोमॅंटिक अंदाजात दिसून येत आहेत.
4 / 7
अनेकदा पापाराझी समोर या कपल ने बिंधास्त लिपलॉक पोझ दिली आहे. या ट्रोलिंगचा दोघांवर काहीच परिणाम होत नाही असेच दिसते.
5 / 7
दोघांचे हॉलिडे फोटोही कायम चर्चेत असतात. भारताबाहेरील वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सवर दोघे हॉलिडेसाठी जात असतात आणि त्यांचे रोमॅंटिक फोटो व्हायरल होत असतात.
6 / 7
श्रिया चा पती अॅंड्र्यु रशियन टेनिस प्लेयर आहे तसेच मोटिव्हेशनल स्पीकरही आहे. २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले.
7 / 7
श्रियाने २०२१ मध्ये मुलीला जन्म दिला. त्यांच्या गोंडस मुलीचे नावही खुप गोड आहे. सध्याच्या फॅशनेबल नावांच्या ट्रेंडमध्ये त्यांनी आपल्या मुलीचे नाव राधा असे ठेवले आहे.
टॅग्स :श्रिया सरनहिंदीदृश्यम 2