Join us  

ललित मोदीला डेट करणाऱ्या सुश्मितामुळे 'या' दिग्दर्शकाने केलेला आत्महत्येचा प्रयत्न; विवाहबाह्य संबंध पडले होते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:29 AM

1 / 10
Lalit Modi says he is dating Sushmita Sen : इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) माजी चेअरमन ललित मोदी ( Lalit Modi) यांनी गुरुवारी एक ट्विट करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
2 / 10
ललित मोदी यांनी अभिनेत्री सुश्मिता सेनला डेट करत असल्याची जाहीरपणे कबुली दिली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या जोडीची चर्चा सुरु आहे.
3 / 10
ललित मोदी यांनी केलेल्या खुलाशानंतर सुश्मिता तिच्या लव्हलाइफमुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी तिने कोणकोणत्या सेलिब्रिटींनी डेट केलंय याची चर्चा रंगली आहे.
4 / 10
ललित मोदीला डेट करण्यापूर्वी सुश्मिताने काही अभिनेता, दिग्दर्शकांना डेट केल्याचं सांगण्यात येतं. यात तिच्या प्रेमात वेडापिसा झालेल्या एका दिग्दर्शकाने चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
5 / 10
एकेकाळी सुश्मिता सेन आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या रिलेशनशीपची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
6 / 10
सुश्मिता वयाच्या १८-१९ व्या वर्षी विक्रम भट्टच्या प्रेमात पडली होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. इतकंच नाही तर, सुश्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्ट यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
7 / 10
सुश्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्ट यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारायचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना वाचवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर केल्याचा पश्चाताप झाल्याचंही त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
8 / 10
सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सुश्मितानेही विक्रम भट्ट यांच्यासोबत असलेल्या नात्यावर भाष्य केलं होतं. तसंच ब्रेकअप करण्यामागचं कारणही सांगितलं.
9 / 10
विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीमध्ये आधीपासूनच वादविवाद होते. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणींसाठी मला दोषी ठरवता येणार नाही. मलाच काय अन्य कोणीही यासाठी जबाबदार नसेल, असं सुश्मिता म्हणाली होती.
10 / 10
दरम्यान, सुश्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्ट यांनी श्वेतांबरी सोनीसोबत लग्न केलं. विशेष म्हणजे विक्रम भट्ट यांचं सुश्मितासोबतच अमिषा पटेलसोबत असलेलं नातंही चर्चेत आलं होतं.
टॅग्स :सुश्मिता सेनललित मोदीसेलिब्रिटीविक्रम भटबॉलिवूड