Join us  

राहुल देवची मराठमोळी गर्लफ्रेंड आहे त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान, अनेक वर्षे दोघे लिव्ह इनमध्ये, पाहा खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:31 AM

1 / 10
Birthday Special : बॉलिवूड अभिनेता राहुल देव (Rahul Dev) चे नाव इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्यांच्या यादीत येतं. राहुल देवने त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्येच नाही तर टॉलिवूडमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
राहुल देव याचा आज वाढदिवस साजरा करतो आहे. राहुल देवचे आयुष्य हे खुल्या पुस्तकासारखे आहे.आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी त्याने कधीही कोणापासून लपवल्या नाहीत. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
राहुल देवचा जन्म 1968 मध्ये दिल्लीत झाला असून त्याचे शिक्षणही दिल्लीत झाले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
राहुलचे पत्नी रीना देववर खूप प्रेम होते. 2009 मध्ये जेव्हा त्यांची पत्नी रीनाचा कर्करोगाने मृत्यू झाला तेव्हा राहुल पूर्णपणे तुटला होता. राहुलसाठी हा काळ खूप कठीण होता. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
याच दरम्यान एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्याची आणि अभिनेत्री मुग्धा गोडसेशी भेट झाली. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
मुग्धा व राहुलची पहिली भेट 2013 साली एका मैत्रिणीच्या लग्नात झाली होती. इथून मैत्री झाली आणि पुढे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
राहुल मुग्धापेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. पण वयातील हे अंतर त्यांच्या प्रेमाआड कधीच आलं नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
2015 साली राहुल व मुग्धाने आपल्या नात्याची कबुली दिली. तेव्हापासून ते लिव्ह इनमध्ये राहतात. पण दोघंही लग्न करू इच्छित नाही. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
दोन व्यक्ती एकमेकांसोबत आनंदी आहेत तर मग लग्न करण्याची गरज काय? लग्नाने काहीही फरक पडत नाही, असं दोघांचंही मत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
मुग्धाने 2008 मध्ये मधुर भंडारकरच्या फॅशन या चित्रपटातून डेब्यू केला होता. यांनतर तिने ऑल द बेस्ट, हेल्प, जेल, हिरोईन अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.(फोटो इन्स्टाग्राम)
टॅग्स :राहुल देवमुग्धा गोडसेसेलिब्रिटी