Join us  

Arbaaz Khan Giorgia Andriani : अरबाजचं मलायकानंतर जॉर्जियासोबतही बिनसलं...? गर्लफ्रेन्ड काय म्हणाली पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 3:48 PM

1 / 10
अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांचं नातं मे 2017मध्ये संपलं. 19 वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकानं एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघंही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत.
2 / 10
एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत खुश्श आहे तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. पण आता कदाचित दोघांचं ब्रेकअप झालं आहे.
3 / 10
होय, अरबाज व जॉर्जिया यांच्यात बिनसल्याची चर्चा जोरात आहे आणि या चर्चेला कारण आहे जॉर्जियाची ताजी मुलाखत. होय, जॉर्जिया बोलता बोलता असं काही बोलून गेली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
4 / 10
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जियाने अरबाजला चांगला मित्र संबोधलं. होय, अरबाजला बॉयफ्रेन्ड न म्हणता तिने तो फक्त माझा चांगला मित्र असल्याचं सांगितलं.
5 / 10
मुलाखतीत जॉर्जियाला तिच्या आणि अरबाजच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला. यावर, खरंच आमचा लग्नाचा काहीही प्लान नसल्याचं तिने स्पष्ट केलं.
6 / 10
अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताच विचार नाही. लॉकडाऊननंतर आमचं नातं फार बदललं आहे, असंही ती म्हणाली.
7 / 10
लग्नाबद्दल आमचा काहीही विचार नाही. लॉकडाऊनने आम्हाला असा विचार करायला भाग पाडलं. लॉकडाऊनमुळे एकतर लोक एकमेकांच्या जवळ आले किंवा लॉकडाऊनने लोकांना दूर केलं, असं ती म्हणाली.
8 / 10
जॉर्जिया ज्यापद्धतीने बोलली त्यावरून दोघांत काही बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. कदाचित आता जॉर्जिया व अरबाज दोघं फक्त चांगले मित्र आहेत. यापेक्षा त्यांच्यात काहीही नाही.
9 / 10
अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयात जवळपास 22 वर्षांचं अंतर आहे. अरबाज खान 55 वर्षांचा आहे. तर जॉर्जिया 33 वर्षांची आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं गेलं आहे.
10 / 10
जॉर्जियाचं नाव फॅशन जगतात खूप मोठं नाव आहे. तिने 30 हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचं नाव आहे.
टॅग्स :अरबाज खानबॉलिवूडजॉर्जिया एंड्रियानी