Join us  

धनुष-ऐश्वर्याच नाही तर साऊथ इंडस्ट्रीतील 'या' कलाकारांचेही झालेत घटस्फोट, बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 5:13 PM

1 / 7
प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा 18 वर्षांचा संसार मोडला. दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत, सर्वांना धक्का दिला. धनुष व ऐश्वर्याला यात्रा आणि लिंगा अशी दोन मुले आहेत.
2 / 7
काही महिन्यांपूर्वी साऊथ इंडस्ट्रीतील अतिशय लोकप्रिय कपलचा संसार असाच मोडला होता. साऊथची बडी स्टार सामंथा रूथ प्रभु आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. 2017 मध्ये हे दोघं विवाहबंधनात अडकले होते आणि चार वर्षांनंतर दोघांनीही काडीमोड घेतला.
3 / 7
नागा चैतन्यचे वडील आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांनी अमला पॉलसोबत दुसरे लग्न केलं. यापूर्वी त्यांचं पहिलं लग्न लक्ष्मी दग्गुबतीसोबत झालं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही आणि लग्नाच्या काही वर्षांनी दोघं वेगळे झाले होते.
4 / 7
साऊथ सुपरस्टार पवन कल्याणचा एकदा नाही तर दोनदा घटस्फोट झाला आहे. 1997 मध्ये त्याने नंदिनीसोबत लग्न केलं. हा संसार फक्त दोन वर्ष टिकला. यानंतर 2009 मध्ये त्याने रेणू देसाईसोबत लग्न केलं. मात्र तीनच वर्षात त्याने तिला घटस्फोट दिला. 2013 मध्ये पवन कल्याणने तिसरं लग्न केलं.
5 / 7
कमल हासनचाही दोनदा घटस्फोट झाला. 1978 मध्ये त्याने वाणी गणपतीशी लग्न केलं. 10 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. वाणीसोबत घटस्फोट झाल्यानंतर कमलच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची एन्ट्री झाली. दोघांनीही लग्न केलं. मात्र 2002 साली कमल आणि सारिका यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला.
6 / 7
कोरिओग्राफर आणि अ‍ॅक्टर प्रभू देवा याचं लग्न लता सोबत झालं होतं. पण प्रभू देवा अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडला आणि तिच्यासाठी त्यानं पत्नीला घटस्फोट दिला. या घटस्फोटाची चांगलीच चर्चा झाली होती.
7 / 7
खलनायकी भूमिका साकारुनही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेते प्रकाश राज यांनी 1994 साली अभिनेत्री ललिता कुमारीशी संसार थाटला होता. पण 2009 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. दुसºयाच वर्षी प्रकाश राज यांनी कोरिओग्राफर पोनी वर्माशी दुसरं लग्न केलं.
टॅग्स :धनुषप्रभू देवाप्रकाश राजकमल हासन