Join us  

अमृता फडणवीसांच्या फॅशनची बातच न्यारी! मिसेस उपमुख्यमंत्र्यांचा डेनिम लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 5:02 PM

1 / 8
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
2 / 8
अमृता अनेक ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित राहताना दिसतात. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या ग्रँड प्री वेडिंगलाही त्यांनी हजेरी लावली होती.
3 / 8
पेशाने बँकर असलेल्या अमृता यांना गाण्याची आवड आहे. पण, त्यांच्या गाण्यांबरोबरच मिसेस उपमुख्यमंत्र्यांच्या फॅशनचीही चर्चा असते.
4 / 8
अमृता अनेकदा त्यांच्या हटके लूकमधील फोटो शेअर करताना दिसतात. आता त्यांनी डेनिम लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
या फोटोमध्ये त्यांनी जीन्स आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केल्याचं दिसत आहे.
6 / 8
त्यांचा हटके लूक चर्चेत आला आहे. या लूकमधील त्यांच्या फोटोंनी लक्ष वेधून घेतलं आहे.
7 / 8
अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे आणि वक्तव्यांमुळेही अनेकदा चर्चेत असतात.
8 / 8
सोशल मीडियावर त्या अगदी परखडपणे त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात.
टॅग्स :अमृता फडणवीसदेवेंद्र फडणवीस