Join us

मॉडलिंगच्या दिवसांमध्ये अशी दिसायची मस्तानी दीपिका पादुकोण, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:00 IST

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण ३२ वर्षांची झाली आहे. ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. तिची आई उजाला ट्रॅव्हर एजेंट तर लहान बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते, जेव्हा ती एक वर्षाची होती.

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण ३२ वर्षांची झाली आहे. ५ जानेवारी १९८६ मध्ये डेनमार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांची मुलगी आहे. तिची आई उजाला ट्रॅव्हर एजेंट तर लहान बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिकाचे आई-वडील तेव्हा बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते, जेव्हा ती एक वर्षाची होती. बंगळुरू येथील सोफिया हायस्कूलमध्ये शालेय आणि माउंट कार्मल कॉलेजमध्ये महाविद्यालय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीपिकाने मॉडलिंग करण्यास सुरुवात केली.दीपिकाने समाजशास्त्र या विषयात इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिर्व्हसिटीमधून बीएचे शिक्षण गेतले. मात्र मॉडलिंगमुळे तिने शिक्षण अर्ध्यातच सोडले.दीपिकाने वयाच्या ८व्या वर्षीच जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. पुढे हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा’ या अल्बममध्ये बघावयास मिळाली.२००६ मध्ये दीपिकाने ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून पडद्यावर एंट्री केली. हा चित्रपट हिट ठरला.एक वर्षानंतर तिला बॉलिवूडचा किंग शाहरूख खान याच्या ‘ओम शांती ओम’मध्ये ब्रेक मिळाला.दीपिका तिच्या लव्ह अफेअरमुळे चांगलीच चर्चेत राहिली. बºयाच अभिनेत्यांबरोबर तिचे नाव जोडले गेले.सद्यस्थितीत दीपिका बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रीपैकी एक आहे.रणवीर सिंगसोबत ती रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच हे दोघे साखरपुडा करणार असल्याची सध्या चर्चा आहे.दीपिका पादुकोण आगामी ‘पद्मावती’ या चित्रपटात राणी पद्मावतीच्या भूमिकेत झळकणार आहे.