दीपिका पादुकोणने होस्ट केली पार्टी; पण जान्हवी कपूर अन् सारा अली खान हवा करून गेली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST
लवकरच ‘पद्मावती’ या चित्रपटात झळकणार असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने शनिवारी रात्री एक जंगी पार्टी दिली. पार्टीत शाहरुख खानसह गौरी खान, आलिया भट्ट, करण जोहर, रणवीर सिंग आदी स्टार्सनी हजेरी लावली होती. परंतु या पार्टीत सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान.
दीपिका पादुकोणने होस्ट केली पार्टी; पण जान्हवी कपूर अन् सारा अली खान हवा करून गेली!
लवकरच ‘पद्मावती’ या चित्रपटात झळकणार असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने शनिवारी रात्री एक जंगी पार्टी दिली. पार्टीत शाहरुख खानसह गौरी खान, आलिया भट्ट, करण जोहर, रणवीर सिंग आदी स्टार्सनी हजेरी लावली होती. परंतु या पार्टीत सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान. पार्टीतील काही इनसाइट फोटो समोर आले असून, त्यामध्ये जान्हवी आणि साराचा अंदाज बघण्यासारखा आहे. पार्टीतील दोघींचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. जान्हवी आणि सारा लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असून, बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याअगोदरच त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळत आहे.