Join us  

बच्चन कुटुंबात सर्वात कमी शिकलीय सूनबाई ऐश्वर्या राय, जाणून घ्या बाकीच्या सदस्यांचं शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 11:08 AM

1 / 7
आज आम्ही तुम्हाला संपूर्ण बच्चन कुटुंबाच्या शिक्षणाबद्दल सांगणार आहोत.
2 / 7
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोललो, तर त्यांनी नैनितालच्या शाळेतून इंटरपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नंतर दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून बीएससीचा कोर्स केला.
3 / 7
प्रत्येक पात्रात स्वत:ला सामावून घेणाऱ्या जया बच्चन यांनी भोपाळमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि नंतर त्यांनी पुण्यातून एफटीआयआयमधून अभिनयात पदवीही घेतली.
4 / 7
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन अभिनयाची पदवी घेण्यासाठी बोस्टन विद्यापीठात गेला होता. परंतु अभिनेत्याने अभ्यासक्रम पूर्ण केला नाही आणि त्याने अर्धवट शिक्षण घेतले.
5 / 7
मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चनच्या शालेय शिक्षणानंतर तिने रचना संसद अकादमी ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीसाठी प्रवेश घेतला. पण मॉडेलिंगमुळे तिला हा कोर्स फार काळ करता आला नाही आणि तिने तो मध्येच सोडला.
6 / 7
अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिने अभिनयापासून दूर आहे. तिने तिचे शिक्षण स्वित्झर्लंडमधून केले आहे आणि त्यानंतर ती अमेरिकेत गेली जिथे तिने बोस्टन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
7 / 7
बच्चन कुटुंबात सर्वात कमी शिक्षण ऐश्वर्या राय बच्चनचं झालं आहे.
टॅग्स :अमिताभ बच्चनऐश्वर्या राय बच्चनजया बच्चनअभिषेक बच्चन