Join us  

सलमानचं नाव ऐकताच सिनेमा नाकारायचा हा खतरनाक व्हिलन, २३ वर्षं सोबत केलं नाही काम, आता समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 8:17 PM

1 / 6
बॉलिवूडमधील दोन दिग्गज अभिनेते सलमान खान आणि खतरनाक व्हिलन डॅन डेंग्झोपा यांनी १९९१ मध्ये आलेल्या सन बेवफा चित्रपटानंतर तब्बल २३ वर्षे एकमेकांसोबत काम केले नव्हते. त्यानंतर सन २०१४ मध्ये आलेल्या जय हो चित्रपटामध्ये दोघेही एकत्र दिसले होते.
2 / 6
डॅनी डेंग्झोपा बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. गेली ५० वर्षे ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आज आम्ही तुम्हाला डॅनी डेंग्झोपा आणि सलमान खान यांच्यात घडलेल्या एका घटनेची माहिती देणार आहोत.
3 / 6
सलमान खान जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आले होते. त्या काळात डॅनी हे बॉलिवूडमधील प्रस्थापित अभिनेत्यांपैकी एक होते. तसेच सलमानपेक्षा खूप सिनियर होते. सिनियर असल्याने ते शिस्तीचं पालन करायचे. यादरम्यान, सलमान खान आणि डॅनी डेंग्झोपा यांनी १९९१ मध्ये आलेल्या सनम बेवफा चित्रपटात काम करत होते.
4 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान, डॅनी सेटवर वेळेत पोहोचले होते. ते सलमानची वाट पाहत होते. सलमान लेट झाल्याने डॅनी बराच वेळ त्याची वाट पाहत होते. जेव्हा सलमान सेटवर आला तेव्हा डॅनी यांनी त्याला फटकारले.
5 / 6
असं सांगतात की, त्यावेळी डॅनी यांनी सलमानला सर्वांसमोर शिस्तीचे धडे दिले. काही रिपोर्ट्सनुसार सलमानच्या वर्तनामुळे डॅनी खूप नाराज झाले होते. त्यांनी सनम बेवफा नंतर तब्बल २३ वर्षे सलमान खानसोबत काम केले नव्हते. यादरम्यान, डॅनी यांना सिनेमांची ऑफर यायची, मात्र त्या सिनेमात सलमान असल्याचे समजले की, ते त्या सिनेमाची ऑफर धुडकावून द्यायचे.
6 / 6
डॅनी आपल्या मतांशी ठाम होते. ते चित्रपटांमध्ये केवळ आपल्या अटीशर्तींवर काम करायचे. अखेरीस दोघांचही पॅचअप झालं. त्यानंतर २०१४ मध्ये ते जय हो चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही चमत्कार दाखवू शकला नाही.
टॅग्स :डॅनी डेन्झोपासलमान खानबॉलिवूड