Join us  

'मेड फॉर इच अदर' कपल कुशल ब्रदिकेच्या पत्नीविषयी या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 1:33 PM

1 / 10
कुशल बद्रिके आणि सुनैना यांच्या प्रेमाची गोष्ट आगळीवेगळी ठरते.कुशल आणि सुनैनाची लव्ह स्टोरी सिनेमातील कथेला साजेशीच म्हणावी लागेल.
2 / 10
कुशल कॉलेजमध्ये असताना एकपात्री स्पर्धेत भाग घेतला होता. ‘ती फुलराणी’मधला एका भागाच्या सादरीकरणावेळी एका तरुणीने कुशलचं लक्ष वेधून घेतले होती. ती तरुणी दुसरी तिसरी कोणी नसून ती सुनैना होती.
3 / 10
काही वर्षांनी योगायोगाने सुनैनासोबत कुशलला पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाली.आश्चर्याच्या बाब म्हणजे सुनैनाने कुशलच्या बायकोची भूमिका साकारली होती.
4 / 10
तिच्याबरोबर काम करताना तो तिच्या प्रेमात पडला होता.दोघांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढु लागल्या. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
5 / 10
आश्चर्य म्हणजे सुनैनानेच कुशलला लग्नासाठी प्रपोज केले होते. कुशलनेही लगेचच होकार दिला. ​घरच्यांकडून त्यांच्या लग्नाला थोड्याफार प्रमाणात विरोधही झाला.
6 / 10
ोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि दोघांचं शुभमंगल पार पडलं.सुनैना खंबीरपणे कुशलच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते,त्याला पाठिंबा देते.
7 / 10
करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी सुनैना त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि कुशलचा विश्वास कधीही ढळू दिला नाही.
8 / 10
कुशलच्या आजवरच्या प्रवासात तिचा मोठा वाटा आहे. लग्नानंतर घर आणि मुलगा यांच्या जबाबदारीमुळं तिची नृत्याची आवड मागं पडली होती
9 / 10
सुनैना तिच्या कलेची आवड जोपासत आहे.सोशल मीडियावर ती अनेक फोटो व्हिडिओ शेअर करत असते. कुशलला देखील तिच्या या कलेचं कौतुक करत असतो.
10 / 10
कुशल बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कायम कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण घालवत एन्जॉय करत असतो. कुशलचे सगळ्याच फोटोंना चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत पसंती देत असतात.
टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्या