Join us

सेलिब्रिटी बाप-लेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 12:05 IST

बॉलिवूडमध्ये घराणेशाही काही नवीन नाही.. अनेक वर्षांपूर्वी ज्या सेलिब्रिटींनी मोठा पडदा गाजवला तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून जे सेलिब्रिटी नावजले गेले, त्यांची पुढची पिढी सध्याच्या सेलिब्रिटी आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० - बॉलिवूडमध्ये तसेच देशात घराणेशाही काही नवीन नाही... अनेक वर्षांपूर्वी ज्या सेलिब्रिटींनी मोठा पडदा गाजवला तसेच वेगवेगळ्या माध्यमांतून जे सेलिब्रिटी नावजले गेले, त्यांची पुढची पिढी, त्यांच्या मुलीही सध्याच्या सेलिब्रिटी आहेत. अशाच काही सेलिब्रिटी बाप-लेकींवर टाकूया नजर...!
 
 
प्रकाश व दीपिका पडूकोण : विख्यात बॅडमिंटनपटू प्रकाश पडूकोण यांची मोठी कन्या दीपिकाही बॅडमिंटनच्या क्षेत्रात नाव उंचावेल असा सर्वांचा होरा होता, मात्र दीपिकाला खुणावत होती चित्रपटसृष्टी... सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली दीपिका काही जाहिरातींमध्ये आपल्या वडिलांसोबतही चमकली आहे. 
 
अनिल व सोनम कपूर :  वो सात दिन, राम-लखन, परिंदा, १९४२ लव्ह स्टोरी, नायक असे अनेक वेगवेळे चित्रपटा करणारा व नावाजला गेलेला अभिनेता म्हणजे अनिल कपूर.. काही वर्षांपूर्वी सावरिया या चित्रपटातून अनिलची मुलगी सोनम हिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. सुरूवातीला फक्त ग्लॅम डॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनमने रांझणा, नीरजा या चित्रपटांद्वारे आपल्या दमदार अभिनयाचीही चुणूक दाखवली.
           
 
रणधीर कपूर - करिश्मा व करिना कपूर : पृथ्वीराज कपूर या अभिनयसम्राटाची चौथी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत दमदारपणे पाय रोवून उभी आहे. अभिनेता रणधीर कपूर यांची मोठ्या पडद्यावर पार जादू चालली नसली तरी त्यांच्या दोन्ही मुली करिश्मा व करिना यांनी आपल्या चोख अभिनयाने बॉलिवूड गाजवलं. कपूर घराण्यातील सुना-मुली मोठ्या पडद्यावर दिसत नाहीत, हा नियम मोडून प्रथम करिश्मा व नंतर करिना चित्रपटसृष्टीत आली आणि रसिकांच्या मनावर राज्य केले. 
 
महेश व पूजा भट्ट : विख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांच्याप्रमाणचे त्यांची मुलगी पूजा हिनेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले पण अभिनेत्री म्हणून. सर, दिल है के मानता नही, जख्म अशा अनेक चित्रपटातील पूजाच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. 
 
महेश व आलिया भट्ट : पूजाप्रमाणेच तिची सावत्र बहीण आलियानेही चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पाय रोवले. पहिल्यांदा केवळ ग्लॅमडॉल असलेल्या आलियाने हायवे, ह्मटी शर्मा की दुल्हनिया, टू स्टेट्स अशा अनेक चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना थक्क केले. आगामी 'उडता पंजाब' या चित्रपटातील तिच्या भूमिकेकडूनही सर्वांना खूप अपेक्षा आहेत. 
 
धर्मेंद्र व इशा देओल :   चित्रपटसृष्टीतील रांगडा पण तितकाच देखणा नायक असलेल्या धर्मेंद्र यांच्या शोले, ड्रीमगर्ल, चुपके-चुपके अशा अनेक चित्रपटांतीव भूमिका खूप गाजल्या. त्यांची मुलगी इशा हिला मात्र मोठ्या पडद्यावर फारसा प्रभाव दाखवता आला नाही. धूम, युवा अशा काही मोजक्या चित्रपटातील तिच्या भूमिका मात्र गाजल्या. 
 
जावेद व झोया अख्तर :  प्रसिद्ध लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलेल्या अप्रतिम कथांनी अनेक नायकांचे भविष्य बदलले. त्यांच्या गीतांनीही मोठ्या पडद्यावर धूम माजवली. एक संवेदनशील लेखक अशी ओळख असणा-या जावेद यांची कन्या व दिग्दर्शक झोया अख्तर हिने आपल्या पहिल्या चित्रपटाद्वारेच ठसा उमटवला. त्यानंतर आलेला जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो हे तिचे चित्रपटही खूप गाजले. 
 
कमल हासन व श्रुती-अक्षरा हासन : दक्षिणेसोबतच बॉलिवूडमध्येही नावाजला गेलेला अभिनेता म्हणजे कमल हासन... त्याच्या मुली श्रुती व अक्षरा या दोघींनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले खरे मात्र त्यांना अद्‌याप हवे तसे यश मिळालेले नाही... 
 
सचिन - श्रिया पिळगावकर : लहानपमापासूनच चित्रपटसृष्टीत जम बसवलेले अभिनेते सचिन यांनी आपल्या हरहुन्नरी अभिनयाने सर्वांनाच आपलेसे केले. आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत श्रियानेही मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. नुकत्याच आलेल्या फॅन चित्रपटात ती खुद्द शाहरूख खानसोबत झळकली. 
 
शक्ती व श्रद्धा कपूर : बॉलिवूडचा बॅड मॅन/ खलनायक अशी ओळख असलेल्या शक्ती कपूरच्या मुलीने श्रद्धाने मात्र आशिकी २ चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. गोड निरागस चेहरा आणि तितकाच सुंदर आवाज यामुळे श्रद्धाने थोड्याच काळात तरूणाईच्या मनावर अधिराज्य केले. 
 
शत्रुघ्न व सोनाक्षी सिन्हा : खामोश असा दमदार आवाजातला डायलॉग ऐकला की डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो .. तो म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांचा.. ८० च्या दशकात सिनेसृष्टीत अनेक दमदार चित्रपट देणा-या शत्रुग्घन सिन्हा यांची मुलगी सोनाक्षीने दंबग स्टार सलमानसोबत काम करत मोठ्या पडद्यावर धूम मचविली... थोड्याच काळात ती तरूणांच्या हृदयाची धडकन बनली आहे.