Join us

विचित्र पोशाखातील क्रूर भूमिका

By admin | Updated: October 2, 2015 00:00 IST

चार्लीज थेरॉन हिने स्नो अँड व्हाइट अँड दी हंटसमन चित्रपटात स्नो व्हाइटच्या सावत्र आईची भूमिका केली होती. तिचा मुकूट ...

चार्लीज थेरॉन हिने स्नो अँड व्हाइट अँड दी हंटसमन चित्रपटात स्नो व्हाइटच्या सावत्र आईची भूमिका केली होती. तिचा मुकूट कानापासून लोंबकळणारे दागिने तिचे आग ओकणारे डोळे थरारक भासायचे.

सुझान सॅरेन्डन हिने एनचान्टेड चित्रपटात नरिसा राणीची भूमिका साकारली होती. सावत्र आई आपल्या मुलीचा नेहमी छळ करते असे पात्र तिने रंगवले होते. तिचे कपडे दागिने सारे काही अद्वितीय असेच होते.

अँजेलिना जोलीने मेलफिसंट चित्रपटात कजाग स्त्रीची भूमिका केली होती. या भूमिकेचा चांगला बोलबालाही झाली. भरजरी कपडे सुदर चेह-याची कजागिण पाहताना प्रेक्षकांना वेगळाच भास व्हायचा.

विवेक ओबेरॉयने क्रिश - ३ या चित्रपटात काल ही खलनायकी भूमिका रंगवली. त्याची भूमिका फारशी गाजली नसली तरी त्याचे २८ किलोचे कवच मात्र लक्षात राहण्याजोगे आहे.

के. के. मेननने द्रोण चित्रपटात रिज रईजादा हे पात्र का रंगवले हे एक कोडंच आहे. त्याचे संपूर्ण पात्र भीतीदायक तर वाटत नाहीच उलट हसूच अधिक येते.

अमरीश पुरींनी हातिमताई या चित्रपटात जादुगाराची भूमिका वठवली आहे. हा चित्रपट बघून त्यांच्या मोगँबो पात्राची आठवण होते.

अमृता सिंगने सूर्यवंशी चित्रपटात सूर्यलेखा राणी साकारली होती. तिचा आत्मा सातत्याने भटकत असतो असे या चित्रपटात दाखवले आहे. अमृता यात नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

श्रीदेवी दोन दशकांच्या कालावधीनंतर पुली या तमिळ चित्रपटाच्याद्वारे पुनरागमन करत आहे. यात ती काल्पनिक साहसी भूमिका करत आहे. श्रीदेवीप्रमाणेच अनेकांनी अशा हटके भूमिका केल्या असून त्याची एक झलक...