Join us  

IN PICS : मला सलमानच्या पाठीवरचं माकड व्हायचं नाही...; जरीन खान असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 12:34 PM

1 / 9
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानने अनेक हिरोईनला संधी दिली. जरीन खान त्यापैकीच एक.
2 / 9
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. हुबेहुब कतरीना कैफ सारखी दिसते म्हणून तिची बरीच चर्चा झाली होती.
3 / 9
पण आता हेच कतरीनासारखे रूप जरीनच्या मागार्तील अडथळा ठरला आहे. सतत कतरिनासोबत होत असलेली तुलना जरीनला नकोशी झाली आहे. शिवाय सलमानच्या ‘उपकाराचं’ ओझंही तिला असह्य झालं आहे.
4 / 9
‘वीर’ चित्रपट फ्लॉप झाल्यानतंरही सलमान हा नेहमी जरीनला मदत करतो, अशी चर्चा कायमच सिनेसृष्टीत रंगत असते. या चर्चांमुळे जरीन संतापली आहे.
5 / 9
नुकतीच जरीनने हिंदुस्तान टाईम्स या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत ती सलमान व तिच्या नात्यावर बोलली.
6 / 9
सलमान अजूनही माझी मदत करतो, असा अनेक लोकांचा समज आहे. मी सलमानचे आभार मानते. कारण तो नसता तर मी कधीच इंडस्ट्रीत आले नसते. त्याने मला इंडस्ट्रीत संधी दिली. पण इथूनच खºया अर्थाने माझा संघर्ष सुरू झाला. त्यावेळी मला काहीही माहिती नव्हते, असं ती म्हणाली.
7 / 9
सलमान खान हा एक शानदार व्यक्ती आहे. पण तो फार व्यस्त असतो. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी मी सलमान आणि त्याच्या भावांच्या पाठीवरचं माकड होऊ शकत नाही. मी जे काही काम करते ते सलमान खानच्या माध्यमातून मला मिळतं, असं लोकांना वाटतं. पण यात काहीही सत्य नाही, असं ती स्पष्टपणे म्हणाली.
8 / 9
सलमान हा मित्र आहे. तो माझ्यापासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. पण म्हणून मी त्याला त्रास देत नाही. माझे वडील आम्हाला लहान असताना सोडून गेले. त्यामुळे माझ्या कुटुंबाची जबाबदारी मी घेतली. मला मदत किंवा मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. मी फार घाबरली होती, असं तिने सांगितलं.
9 / 9
अनेकदा मी इंडस्ट्रीत एकटी असहाय्य आहे, असं मला जाणवतं. मला चांगलं काम करायचं होतं. पण मला अभिनय कौशल्य दाखवायची परवानगी नव्हती,असंही ती म्हणाली.
टॅग्स :जरीन खानसलमान खान