Join us  

PICS : ‘शोर मचेगा’ गाण्यातील या तरूणीची होतेय हनी सिंगपेक्षा अधिक चर्चा, कोण आहे ही बाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 8:00 AM

1 / 10
जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’ या आगामी सिनेमाच्या ‘शोर मचेगा’ या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. शिवाय या गाण्यातील एका नव्या को-या चेह-यानेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
2 / 10
हे गाणे हनी सिंह व होमी दिल्लीवालाने गायले आहे. गाणे युट्यूबवर हिट झाले आहे. पण मजेदार गोष्ट म्हणजे गाण्यापेक्षा यातील डान्सरची चर्चा आहे.
3 / 10
‘शोर मचेगा’ मधील सर्वांना वेड लावणारी डान्सर कोण? हे जाणून घेण्यास चाहते उत्सूक आहेत. तर ‘शोर मचेगा’ या गाण्यात आपल्या मादक अदा दाखवणाºया या डान्सरचे नाव श्रुती सिन्हा असे आहे.
4 / 10
श्रुतीची पहिली ओळख म्हणजे, ती प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर, मॉडेल आणि टीव्ही सेलिब्रिटी आहे.
5 / 10
एम टीव्ही स्प्लिट्सविला हा रिअ‍ॅलिटी शो जिंकून ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती.
6 / 10
रोडीज एक्सट्रीम आणि डान्स इंडिया डान्स या शोंमध्ये देखील ती झळकली आहे.
7 / 10
स्प्लिट्सविला शोमध्ये असताना ती को-कंटेस्टंट रोहन हिंगोरानीच्या प्रेमात पडली होती.
8 / 10
रोहनने शोमध्येच तिला प्रपोज केले होते. मात्र हा शो जिंकताच तिने रोहन हिंगोरानीसोबत ब्रेकअप केले होते.
9 / 10
अभिनय आणि डान्ससोबतच श्रुती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
10 / 10
सध्या श्रुती हनी सिंगच्या शोर मचेगा या गाण्यामुळे चर्चेत आहे. मुंबई सागा हा चित्रपट 19 मार्चला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :हनी सिंहजॉन अब्राहम