Join us  

PHOTOS : पांढरी दाढी... थकलेलं शरीर..., आमिर खानला तर ओळखणंही झालं कठीण...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 3:48 PM

1 / 7
‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात आमिर खान एकदम हटके लुकमध्ये दिसला होता. या चित्रपटाकडून त्याला मोठ्या अपेक्षा होत्या. पण चित्रपट दणकून आपटला. या चित्रपटानंतर बऱ्याच दिवसांनी आमिर खान पब्लिकली दिसला आणि त्याला पाहून सगळेच थक्क झालेत.
2 / 7
होय, आमिरचा लुक पाहून त्याला ओळखणंही कठीण झालं. मिस्टर परफेक्शननिस्टची पांढरी दाढी अन् थकलेला चेहरा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
3 / 7
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या आईच्या अंत्ययात्रेत आमिर सहभागी झाला होता. तेव्हा त्याचा हा लूक पाहायला मिळाला. यावेळी आशुतोष गोवारीकरही त्याच्यासोबत दिसला.
4 / 7
ज्यांनी कुणी आमिरचा हा अवतार पाहिला, त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास होईना. अनेकांनी आमिरचा हा बदललेला लुक पाहून कमेंट्स केल्या.
5 / 7
अरे हा आमिर खानच ना? मी तर ओळखलंच नाही, अशी कमेंट एका युजरने दिली. आमिर आता म्हातारा झाला, असं एका युजरने लिहिलं. आमिर नाना... म्हणत अनेकांनी त्याची खिल्लीही उडवली.
6 / 7
‘लाल सिंग चड्ढा’च्या रिलीजनंतर आमिर पब्लिकली दिसला नव्हता. पण दिसला तो या अवतारात. ‘लाल सिंग चड्ढा’मधून आमिरने चार वर्षानंतर कमबॅक केलं होतं.
7 / 7
‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिरने अद्याप आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. याआधी आलेला त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ हा सिनेमाही दणकून आपटला होता.
टॅग्स :आमिर खानबॉलिवूडआशुतोष गोवारिकर