पोटासाठी बारमध्ये डान्स करत होती बॉबी डार्लिंग, मेहनतीने बॉलिवूडमध्ये मिळवली वेगळी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:55 IST
1 / 10'बॉबी डार्लिंग'...(Bobby Darling) हे नाव भारतात कुणाला माहीत नाही असं क्वचितच कुणी असेल. बॉबी डार्लिंगची बॉलिवूड आणि टीव्हीवर वेगळी ओळख आहे. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी बॉबी डार्लिंगला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यादरम्यान बॉबीने तिच्या जीवनात अनेक चढउतार पाहिलेत. पण तिने कधी हार मानली नाही. तिने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली. 2 / 10बॉबी डार्लिंग उर्फ पाखी शर्मा उर्फ पंकज शर्मा. दिल्लीत राहणाऱ्या बॉबी डार्लिंगचा जन्म पंकज शर्माच्या रूपात झाला होता. ती लहान असतानाच तिच्या आईचं निधन झालं होतं. वय वाढलं तर बॉबी तरूणींकडे जास्त आकर्षीत होत होती आणि मुलींप्रमाणे हावभाव-कपडेही तसेच घालत होती. पण तिच्या घरातील लोकांना तिच्या या सवयी आवडत नव्हत्या.3 / 10१५ वर्षांची असताना बॉबीला जाणीव झाली की, तो शरीराने पुरूष आहे, पण आतून एक महिला आहे. बॉबीने जेव्हा ही बाब वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी तिला घरातून काढलं. त्या काळात ट्रान्सजेंडर या शब्दाकडे भारतात पाप म्हणून पाहिलं जात होतं. पण बॉबीने यासोबतच जगण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरू झाला बॉबीचा खरा संघर्ष.4 / 10दिल्लीत कुणाच्यातरी मदतीने बॉबी डार्लिंग फॅशन इंडस्ट्रीशी जुळली आणि आपल्या टॅलेंटच्या जोरावर हळूहळू ओळख निर्माण केली. त्यानंतर बॉबीने जेंडर चेंन्ज करण्याचा निर्णय घेतला. पंकज शर्मा आता पाखी शर्मा झाली होती. पण तरीही तिचा संघर्ष काही कमी झाला नाही. कारण २० वर्षाआधी ट्रान्सजेंडर हा विषय भारतात अगदीच नवीन होता. लोक सहजपणे हे स्वीकारत नव्हते.5 / 10बॉबी डार्लिंगने ट्रान्सजेंडर म्हणून जेव्हा मुंबईत पाउल ठेवलं तेव्हा तिला बॉलिवूडमध्ये काही काम मिळालं नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी तिने बारमध्ये डान्स केला. त्यानंतर मुंबईतील फॅशन इंडस्ट्रीत पाउल ठेवलं आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. यादरम्यान तिची अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत ओळख झाली. काही सिनेमातही ती दिसली. १९९९ मध्ये बॉबीला एका मोठ्या सिनेमात काम मिळालं.6 / 10बॉबी डार्लिंगला १९९९ मध्ये सुभाष घई यांच्या 'ताल' सिनेमात काम मिळालं. हा तिचा पहिला सिनेमाहोता. या तिने ड्रेस डिझायनरची एक छोटी भूमिका केली होती. यानंतर बॉबी लोकप्रिय झाली. त्यानंतर तिने 'स्टाइल', 'न तुम जानो न हम', 'मैंने दिल तुझको दिया', 'जीना सिर्फ़ मेरे लिये', 'पेज 3', 'क्या कूल हैं हम', 'टॉम डिक एंड हैरी', 'अपना सपना मनी मनी', 'ट्रॅफ़िक सिग्नल', 'शिरिन फ़रहाद की तो निकल पड़ी' आणि 'हंसी तो हंसी' सारख्या सिनेमात काम केलं.7 / 10बॉबी डार्लिंगने २००४ मध्ये 'कहीं किसी रोज़' या मालिकेतून डेब्यू केलं. त्यानंतर ती 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी ज़िंदगी की', 'फ़ेम गुरुकुल', 'बिग बॉस सीज़न-1', 'सच का सामना', 'इमोशनल अत्याचार', 'इस प्यार को क्या नाम दूं', 'आहट', 'ये है आशिक़ी', 'ससुराल सिमर का' आणि 'कृष्णाकोली' सारख्या मालिकांमध्ये दिसली.8 / 10बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केल्यावर बॉबीने LGBT अधिकारांचं बिनधास्तपणे समर्थनही केलं. २०१६ मध्ये बॉबीने भोपाळमधील व्यावसायिक रमनीक शर्मासोबत लग्न केलं हों. पण सप्टेंबर २०१७ मध्ये तिने फसवणूक, वैवाहिक अत्याचार, अनैसर्गिक लैंगिक संबंध यामुळे पती रमणीक शर्मा याच्याविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. नंतर मे २०१८ मध्ये रमणीक शर्माला कौटुंबिक हिंसाचारासाठी अटकही झाली.9 / 1010 / 10बॉबी डार्लिंग अखेरची २०१४ मध्ये बॉलिवूड सिनेमा 'Dee Saturday Night' सिनेमात दिसली होती. पण गेल्या पाच वर्षांपासून बॉबी अचानक गायब झाली आहे. ती ना मालिकांमध्ये दिसत आहे ना सिनेमा. ती कुठे आहे असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडतो.