Join us  

IN PIC : रोमॅन्टिक सीन देताना शाहरूखच्या या वागण्याने काजोलही झाली होती थक्क...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 8:00 AM

1 / 8
शाहरूख खान व काजोल ही बॉलिवूडची सर्वात फेवरेट जोडी. दोघींच्या पडद्यावरच्या केमिस्ट्रीचे चर्चा आजही होता. ‘बाजीगर’ हा शाहरूख व काजोलचा पहिला एकत्र सिनेमा. पण याच सिनेमाच्या सेटवर शाहरूखने असे काही केले की काजोलही हैराण झाली होती.
2 / 8
शाहरूखने स्वत: करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. यावेळी काजोलही त्याच्यासोबत होती.
3 / 8
तर ‘बाजीगर’च्या सेटवर एक रोमॅन्टिक सीन शूट होत होता. ‘मेरा दिल था अकेला, मैंने खेल ऐसा खेला’ हे ते गाणे. गाण्यात काजोलला काही एक्सप्रेशन द्यायचे होते. पण अनेक प्रयत्न करूनही काजोलला ते भाव जमेनात.
4 / 8
मग काय, या गाण्याची कोरिओग्राफर सरोज खान गुपचूप शाहरूखच्या कानात कुजबुजली. ती काय म्हणाली कोणालाही ठाऊक नाही.
5 / 8
पण दुस-याच क्षणाला शाहरूख व काजोल शॉट द्यायसाठी उभे झालेत. कॅमेरा सुरु झाला आणि शाहरूखने नकळत काजोलला चिमटा काढला. शाहरूखच्या या वागण्याने काजोल हैराण झाली. पण आश्चर्य म्हणजे, त्याच क्षणाला काजोलचे हवे एक्सप्रेशन मिळाले आणि शॉट ओके झाला.
6 / 8
काजोल व शाहरूख ख-या आयष्यात खूप चांगले मित्र आहेत. आज इतक्या वर्षानंतरही दोघांची मैत्री कायम आहे.
7 / 8
काही महिन्यांआधी काजोलने आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरूख माझा आयुष्यभरासाठीचा मित्र असल्याचे म्हटले होते.
8 / 8
अजय मिळाला नसता तर शाहरूखशी लग्न केले असते का? असा प्रश्न एका चाहत्याने काजोलला केला होता. यावर ‘तो बंदा कधीही प्रपोज करणार नव्हता,’ असे मजेदार उत्तर तिने दिले होते.
टॅग्स :काजोलशाहरुख खान