Join us  

माधुरीने खाल्लेल्या 'वडापाव'ची किंमत किती? अंबानींच्याही घरी जातो पार्सल; मालकानेच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 9:44 PM

1 / 11
धकधक गर्ल माधुरी दीक्षितनेही दोन दिवसांपूर्वी वडापाव वर ताव मारला. माधुरीने टीम कुक यांच्यासोबत वडापावची चव चाखलीय. त्यांनाही हा वडापाव जाम आवडलाय.
2 / 11
जगविख्यात मोबाईल कंपनी असलेल्या Apple कंपनीला देशात 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे कंपनीचे मुंबईत स्टोअर सुरू केले. त्यासाठी कंपनीचे सीईओ टीम कुक भारतात आले होते.
3 / 11
टीम कुक यांनी स्टोअरच उद्धाटन करण्यापूर्वी तेथील टीमची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुंबईचा फेरफटका मारत प्रसिद्ध मुंबई वडापाववर देखील ताव मारला. विशेष म्हणजे कुक यांना वडापावची मेजवाणी देणारी सेलिब्रिटी चक्क माधुरी दीक्षित होती.
4 / 11
माधुरी दीक्षितने स्वत: या भेटीचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. तसेच, मुंबईत वडापावपेक्षा भारी स्वागत दुसरं कशानेच होत नाही, असे म्हणत माधुरीने फोटो शेअर केलाय.
5 / 11
माधुरीच्या ट्विटला रिप्लाय देत, माझ्या पहिल्या वडापावच्या ट्रीटसाठी धन्यवाद माधुरी दीक्षित, चव उत्तम होती. असे टीम कुक यांनी म्हटलंय. सध्या सोशल मीडियावर या जोडीचा आणि वडापाव खातानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
6 / 11
मुंबईतील ताडदेव परिसरातील स्वाती स्नॅक्स सेंटरमध्ये माधुरी दीक्षित आणि एपलचे सीईओ टीम कुक यांनी हा वडापाव खाल्ला होता. साहजिकच तेथील वडापावची किंमतही तशीच असणार आहे.
7 / 11
१७० ते ४०० रुपयांपर्यंतच्या किंमतीत येथे वडापाव मिळतो. माधुरी दीक्षितने खाल्लेला वडापाव १८० रुपयांचा होता, त्यात एक प्लेटमध्ये २ वडा आणि २ पाव येतात.
8 / 11
बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी येथील वडापावची चव चाखल्याचेही रेस्टोचे मालक यांनी सांगितलं. दीपिका पदुकोण, दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनीही येथील वडापाव खाल्ला आहे.
9 / 11
क्रिकेटर्समध्ये संजय मांजरेकर, तर उद्योग जगतातील अंबानींच्या घरीही पार्सल जातो, बिर्ला, जिंदाल यांनाही येथील वडापाव आवडतो. एम.एफ.हुसेन हेही येतात.
10 / 11
काँग्रेस नेते राहुल गांधी हेही येथील वडापाव खायला आले होते, राज ठाकरेंनीही येथे वडापाव खाल्ला होता, असे स्वाती स्नॅक्स सेंटरचे डायरेक्टर करण शहा यांनी सांगितलं.
11 / 11
स्वाती स्नॅक्सचे मुंबईत तीन आऊटलेट आहेत, या तिन्ही आऊटलेटचं काम करण शहा हेच पाहतात. तर, आशा मॅडम यांच्या रेसिपीतून हा वडापाव बनतो, असेही शहा यांनी सांगितलं.
टॅग्स :माधुरी दिक्षितमुंबईबॉलिवूडराज ठाकरे