Join us  

Zeenat Aman : बॉलिवूड सेलिब्रिटींचे घटस्फोट का होतात?, झीनत अमान यांनी सांगितलं कारण

By ओमकार संकपाळ | Published: February 27, 2023 4:45 PM

1 / 12
बॉलिवूड विश्वात नवे ट्रेंड आणणारी बोल्ड अभिनेत्री म्हणून झीनत यांचं नाव घेतलं जातं. ७०च्या दशकांत बॉलिवूडचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
2 / 12
पुरुषप्रधान चित्रपटांच्या काळात झीनत अमान यांनी चित्रपटातील अभिनेत्रीचं महत्त्व अधोरेखित केलं. तूर्तास झीनत अमान एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आल्या आहेत.
3 / 12
होय, वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी इन्स्टावर पदार्पण केलं आहे. सध्या त्यांच्या इन्स्टा पोस्टची जोरदार चर्चा आहे. आता त्यांनी मोठा खुलासा केला आहे.
4 / 12
बॉलिवूडमधील लग्न टिकत नाहीत, यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे. स्वत: झीनत यांचं वैवाहिक आयुष्यही अपयशी ठरलं होतं.
5 / 12
झीनत यांनी करिअरमध्ये खूप यश मिळवलं मात्र त्यांचं वैवाहिक आयुष्य यशस्वी होऊ शकलं नाही. त्यांना वैवाहिक आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागला.
6 / 12
‘एबीपी’ला दिलेल्या एका मुलाखतीत झीनत अमान यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न केला गेला. बॉलिवूडमध्ये बहुतांश लग्न मोडतात, घटस्फोट होतात, याचं कारण काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
7 / 12
त्यावर त्यांनी हैराण करणारं उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हणतात. ती गाठ टिकणारी असेल तर नक्कीच टिकणार.. पण काही गोष्टी आपल्या नशीबात नसतात त्यामुळे त्या आपल्याला मिळत नाहीत.”
8 / 12
“कलाकार लग्न करतात, तेव्हा ते टिकवण्यासाठीही प्रयत्न करतात. ते लग्न यासाठी करतात कारण त्यांना ते करायचं असतं. मी काही मुलींना ओळखते त्यांनी लग्न टिकवण्यासाठी अशा गोष्टी केल्या आहेत ज्या सामान्य व्यक्तीही करणार नाही,” असंही त्या म्हणाल्या.
9 / 12
“वैवाहिक आयुष्यात समस्या येतात. त्या सुटणाऱ्या नसतील तर आयुष्यभर त्रास करण्यापेक्षा संपूर्ण आयुष्य सिंगल राहिलेलंच बरं,” असंही त्या म्हणाल्या.
10 / 12
८० च्या दशकांत प्रसिद्ध अभिनेते संजय खान आणि झीनत यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यादरम्यानच्या काळात मासिकांमध्येही त्यांनी लग्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या नात्याचा शेवट फारच वेदनादायी होता.
11 / 12
1985 मध्ये झीनत अमान यांनी मजहर खान यांच्यासोबत लग्न केले. पण झीनत आणि मजहर यांचं वैवाहिक आयुष्य सुखी नव्हतं. लग्नानंतर काहीच दिवसांत दोघांमध्येही वाद होऊ लागलेत. असे म्हणतात की, मजहर झीनत यांना मारहाण करायचे.
12 / 12
दोन मुलं आणि पत्नी असताना मजहर यांनी रूबिना मुमताजसोबत दुसरं लग्न केलं. ही गोष्ट झीनत यांच्या जिव्हारी लागली आणि झीनत यांनी मजहर यांच्यापासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत मजहर किडनीच्या आजाराने अंथरूणाला खिळले होते. घटस्फोट होण्याआधीच मजहर यांचं निधन झालं.
टॅग्स :झीनत अमान