Join us

वरूण-आलियाचा दिमाखदार लुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:24 IST

‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ अलीकडेच रिलीज झाला असून त्याचे प्रमोशन अद्यापही अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे करत आहेत. मुंबईच्या एका स्टुडिओत ते आले असता त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. यावेळी आलिया वरूणच्या टीशर्टवर असलेले हृदय हे तिचे असल्याचे जणू काही सांगत आहे, अर्थात हा प्रमोशनचा भाग आहे.

‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ अलीकडेच रिलीज झाला असून त्याचे प्रमोशन अद्यापही अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे करत आहेत. मुंबईच्या एका स्टुडिओत ते आले असता त्यांनी फोटोग्राफर्सना पोझ दिली. यावेळी आलिया वरूणच्या टीशर्टवर असलेले हृदय हे तिचे असल्याचे जणू काही सांगत आहे, अर्थात हा प्रमोशनचा भाग आहे.अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री आलिया भट्ट हे चाहत्यांचे आॅलटाइम फेव्हरेट स्टार्स आहेत. वांद्रे येथील मेहबुब स्टुडिओत ते आले होते. तेव्हा त्यांचा हा दिमाखदार लुक. सर्वांनी पाहायलाच हवा..स्टुडिओत वरूण कारमधून मोबाईलवर बोलत बोलतच बाहेर आला. त्याच्या चेहºयावरचे क्युट स्माईल काही कमी झाले नाही. हे पाहा...वरूण धवनच्या राखाडी रंगाच्या टीशर्टवर लाल रंगाचे एक हृदय काढलेले होते. त्याच्याकडे बोट दाखवत जणूकाही आलिया सांगतेय की, हे पाहा माझं हृदय...घाबरू नकात हा सर्व प्रमोशनचा भाग असतो.हार्ट दाखवत असताना आलिया तिचे खोडकर हावभाव करायला विसरली नाही. एकमेकांसोबत ते किती परफेक्ट दिसतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा फोटो...बद्रिनाथ की दुल्हनियाँचे शूटिंग बिहारमध्ये झाले असल्याने त्याच्या प्रमोशनसाठीही आलियाने ग्लॉसी असा ड्रेस घातला होता. यावेळी पोझ देताना ती तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्येच दिसत होती.आॅफ व्हाईट रंगाचा टीशर्ट आणि फिकट निळ्या रंगाची जीन्स घातलेला वरूण धवननेही फोटोग्राफर्सना अशी स्टायलिश पोझ दिली. डोक्यावरची टोपीही तेवढीच लक्षवेधी ठरत होती.