Join us  

तब्बल १२ वर्षानंतर रंगीला गर्ल करणार कमबॅक,या कारणामुळे इंडस्ट्रीपासून होती दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 4:00 PM

1 / 11
रुपेरी पडद्यावर उर्मिलाचे दर्शन घडले नसले तरीही ती सोशल मीडियावर मात्र चाहत्यांच्या संपर्कात होती.
2 / 11
आता पुन्हा एकदा उर्मिला रसिकांचे मनोरंजनक करण्यासाठी सज्ज झाली आहे.
3 / 11
एका वेब सीरीजच्या माध्यमातून उर्मिला रसिकांच्या भेटीला येणार असल्याचं समजतंय.
4 / 11
वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरदेखील उर्मिलाचा चार्म पुर्वीएवढाच कायम आहे.
5 / 11
वयाच्या ४२ व्या वर्षी उर्मिलाने 9 वर्षांनी लहान असलेला उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
6 / 11
एकेकाळी उर्मिला यशाच्या शिखरावर होती.असे म्हणतात की, याच व्यक्तिमुळे उर्मिलाचे करिअर उद्धवस्त झाले.
7 / 11
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती व्यक्ती होती दिग्दर्शक राम गोपाल वर्मा.
8 / 11
उर्मिलाला सर्वाधिक लोकप्रियता मिळवून दिली ती राम गोपाल वर्मांच्या 'रंगीला' या सिनेमाने.
9 / 11
राम गोपाल वर्मांचे बॉलिवूडमधील इतर कोणत्याही दिग्दर्शकासोबत फारसे पटायचे नाही.
10 / 11
याचा फटका उर्मिलाला बसला. राम गोपाल वर्मांमुळे अन्य दिग्दर्शकांनी उर्मिलाचा फारसा विचार केला नाही.
11 / 11
याचा परिणाम म्हणजे, हळू हळू तिला काम मिळणे बंद झाले आणि उर्मिला दूर फेकली गेली.
टॅग्स :उर्मिला मातोंडकर