Join us  

अजय देवगणने या सुपरहिट चित्रपटांना दिला होता नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 2:47 PM

1 / 7
अजय देवगणने संजय लीला भन्साळीसोबत हम दिल दे चुके या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील अजयच्या भूमिकेचे कौतुक देखील झाले होते. या चित्रपटानंतर बाजीराव मस्तानी या चित्रपटात अजयसोबत पुन्हा काम करण्याची संजयची इच्छा होती. पण अजय काही चित्रपटाच्या चित्रीकरणांत व्यग्र असल्याने संजयने या भूमिकेसाठी रणवीर सिंगची निवड केली.
2 / 7
डर या चित्रपटातील शाहरुख खानच्या अभिनयाचे कौतुक आज देखील केले जाते. पण या चित्रपटातील राहुल या भूमिकेसाठी अजय देवगणला विचारण्यात आले होते. पण त्यावेळी अजय एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने या चित्रपटासाठी त्याने नकार दिला होता.
3 / 7
अजय देवगणची पत्नी अभिनेत्री काजोलचा कुछ कुछ होता है हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसला होता. पण या भूमिकेसाठी अजयला विचारण्यात आले होते असे म्हटले जाते.
4 / 7
अजय देवगणचा आज वाढदिवस असून त्याने आजवर अनेक अॅक्शन, कॉमेडी चित्रपटात काम केले आहे.
5 / 7
फूल ऑर काँटे या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अजयने आजवर प्यार तो होना ही था, दिलवाले, जख्म, सिंघम, गोलमाल यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
6 / 7
अजयला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळाले असून त्याला जख्म या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मामित करण्यात आले होते. तसेच २०१६ मध्ये त्याला पद्मश्री हा किताब देऊन भारत सरकारने त्याचा गौरव केला होता.
7 / 7
करण अर्जुन या चित्रपटात शाहरुख खान आणि सलमान खानची नव्हे तर शाहरुख खान आणि अजय देवगण यांची जोडी जमणार होती. पण काही कारणास्तव अजय या चित्रपटाचा भाग बनू शकला नाही.
टॅग्स :अजय देवगण