Join us  

'स्वदेश'मधली गायत्री जोशी आठवतेय?, बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतरही आहे इतक्या कोटींची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 7:00 AM

1 / 10
शाहरुख खानच्या 'स्वदेश' सिनेमातून गायत्री जोशी घराघरात पोहोचली. गायत्रीला तिच्या स्वदेश या पहिल्याच चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ​(Photo Instagram)
2 / 10
या चित्रपटातील तिच्या सौंदर्याची आणि विशेषतः तिच्या अभिनयाची चांगलीच चर्चा झाली होती. (Photo Instagram)
3 / 10
​गायत्रीने पहिल्याच चित्रपटानंतर बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. गायत्री अभिनयक्षेत्रात येण्याआधी एक प्रसिद्ध मॉडेल होती. (Photo Instagram)
4 / 10
फेमिना मिस इंडिया स्पर्धेत पहिल्या पाच स्पर्धकांमध्ये तिची वर्णी लागली होती. त्यानंतर 2000 मध्ये तिने एका इंटरनॅशनल कॉम्पिटेशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. (Photo Instagram)
5 / 10
​त्यामुळे तिला मॉडलिंगच्या अनेक ऑफर येत होत्या. त्यानंतर तिने जगजीत सिंग यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले होते. तसेच हंस राज हंस यांच्या झांझरिया या अल्बममध्ये देखील ती झळकली होती. (Photo Instagram)
6 / 10
अनेक जाहिरातींमध्ये काम केल्यानंतर तिला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. स्वदेश या पहिल्याच चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. (Photo Instagram)
7 / 10
स्वदेश हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काहीच वर्षांत तिने विकास ऑबेरॉय या व्यवसायिकासोबत लग्न केले. (Photo Instagram)
8 / 10
​आज ती बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर असून परदेशात आपल्या कुटुंबियांसोबत राहाते. गायत्री आणि विकास यांना दोन मुले असून ती जास्तीत जास्त वेळ मुलांना देते. (Photo Instagram)
9 / 10
​विकासकडे दहा हजार करोडोहून अधिक संपत्ती असल्याचे म्हटले जाते. (Photo Instagram)
10 / 10
टॅग्स :शाहरुख खान